कोविड हॉस्पिटल चालकांकडून रुग्णांची होतीये मोठया प्रमाणात लुट

संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक ठिकाणी कोरोना बाधितांची हॉस्पिटल चालकांकडून लुट होत असल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत असताना देखील यामध्ये पुणे जिल्हा देखील मागे राहिलेला नसून शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील काही खासगी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या काळामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले असून सुद्धा या खासगी हॉस्पिटल मध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच रुग्णांना अनामत रक्कम भरण्याचा तगादा लावला जात असुन कोरोना बाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे.

शिक्रापूर: संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक ठिकाणी कोरोना बाधितांची हॉस्पिटल चालकांकडून लुट होत असल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत असताना देखील यामध्ये पुणे जिल्हा देखील मागे राहिलेला नसून शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील काही खासगी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या काळामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले असून सुद्धा या खासगी हॉस्पिटल मध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच रुग्णांना अनामत रक्कम भरण्याचा तगादा लावला जात असुन कोरोना बाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

वरिष्ठांच्या दबावामुळे शिरुर येथील कॅन्टीन चालकावर अन्याय

शिक्रापूर येथे काही हॉस्पिटलमध्ये खासगी कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून येथे त्यानंतर उपचार सुरु असताना रुग्णांना साध्या प्रकारचे मास्क देऊन देखील बिलामध्ये जास्त किंमत लावली जात असून रुग्णांना उपचारासाठी महागडी औषधे आणण्यास भाग पाडले जात आहे. तर काही रुग्णांना व्हेंटीलेटर लावल्याचे दाखविले जात असून रुग्णांना नंतर देण्यात येणारी उपचार फाईल अर्धवटपणे देऊन रुग्णांची पिळवणूक केली जात आहे. तर फाईल साठी संपर्क साधण्यासाठी ठराविक वेळेचे बंधन घातले जात आहेत. काही ठिकाणी रुग्णांचे वाद देखील झालेले असून अनेकांची मोठी पिळवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर काही रुग्णांनी आरोग्यमंत्री, प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांची होणारी लुट व पिळवणूक थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेशनिंग तपासणीनंतर कारवाईला ठेंगा

रुग्णांची अडवणूक झाल्याचे समोर आले आहे:- रमेश घोडे (उपकोषागार अधिकारी शिरुर)
प्रांताधिकारी साहेबांनी आम्हाला चौकशी करण्याबाबत सांगितले होते, त्यानुसार आम्ही तक्रारदार व्यक्तीकडे देखील चौकशी केली आहे. त्यामध्ये शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटल कडून ग्राहक रुग्णाला देण्यात आलेल्या बिलाची रक्कम जास्त असल्याचे तसेच रुग्णाची अडवणूक झाली असल्याचे आमच्या समोर आले आहे, असे रमेश घोडे यांनी सांगितले.

कोकणाप्रमाणे भोर उपविभागात यापुढे गंजरोधी विजेचे खांब

चौकशीचे आदेश दिलेले आहेत:- डॉ. भगवान पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी)
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉस्पिटलच्या तक्रारी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या प्रकाराबाबत तक्रार आलेली असून याबाबत मी आमच्या डॉ. जोशी यांना चौकशीचे आदेश दिले असल्याचे चौकशी नंतर पुढील कार्यवाही केली जाईल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

Title: A large number of patients were robbed by Kovid hospital ope
प्रतिक्रिया (1)
 
भूषण विधाटे
Posted on 28 October, 2020

तुम्ही हॉस्पिटल चे नाव का नाही सांगत कार्यवाही नका करू दंड ठोका 10 पट

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे