काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरुच, तर लाखोंचा दंड वसूल
वीस दिवसात १७७१ वाहनांवर कारवाई
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपासुन काळ्या काचांच्या वाहनांनी हैदास घातला असताना आता शिक्रापूर पोलिसांनी बेशिस्त वाहनांसह काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु केली असुन २० दिवसात १७७१ वाहनांवर कारवाई करुन तब्बल ५ लाख ९१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपासुन काळ्या काचांच्या वाहनांनी हैदास घातला असताना आता शिक्रापूर पोलिसांनी बेशिस्त वाहनांसह काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु केली असुन २० दिवसात १७७१ वाहनांवर कारवाई करुन तब्बल ५ लाख ९१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली आहे.
वन्य पशु पक्षी संरक्षण समितीच्या सर्पमित्रांच्या मागणीला यश
शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात सर्वत्र अनेक दिवसांपासुन गडद काळ्या रंगांच्या काचांच्या वाहनांचा वावर वाढला आहे. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरणाऱ्या सर्व बेशिस्त वाहन चालक व काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिले असुन त्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने एक पोलीस अधिकारी, नऊ पोलीस कर्मचारी, दहा होमगार्ड नेमण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून परिसरातील बेशिस्त वाहनचालक आणि गडद काळ्या रंगाच्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी २ नोव्हेंबर पासुन १६८४ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करुन ५ लाख ७४ हजार २०० रुपये तर ८६ काळ्या रंगाच्या काचांच्या वाहनांवर कारवाई करुन १७ हजार २०० रुपये दंड असा एकूण ५ लाख ९१ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे, तर काळ्या काचांच्या वाहनाच्या काळ्या फिल्म जागेवरच काढून टाकण्यात येत आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा परिसरातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असुन पुढील काळामध्ये काळ्या काचा नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात देखील मोठी मदत होणार आहे.
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे; चंद्रकांत दादा पाटील
नागरिकांच्या काचा काढल्या मग पोलिसांचे काय ?
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई मोहीम पोलिसांनी सुरु केली असुन सर्व नागरिकांच्या वाहनांवर दंड आकारला जात आहे. परंतु, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या काचा गडद काळ्या आहेत. मग त्यांच्या वाहनांचे काय? असा सवाल नागरिकांना पडला असुन पोलिसांच्या वाहनांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्कश आवाजांच्या बुलेटचे काय ?
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पोलिसांनी काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु केली असताना नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे. मात्र, अनेक दिवसांपासुन कर्कश आवाजांच्या बुलेट वाहनामुळे नागरिक व ग्रामस्थ त्रस्त झालेले असताना या कर्कश आवाजांच्या बुलेटचे काय ? असा सवाल नागरिकांना पडला आहे.