आहेर दांपत्याची दूध व्यवसायात झेप

पुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरुर) येथील सुनील आणि धनश्री या आहेर दांपत्याने शेतीला पुरक जोड व्यवसायाची साथ म्हणून दूध संकलनासह दुग्धजन्य पदार्थ निर्मितीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात पाऊच पॅकिंगमध्ये दूध, दही, लस्सी आणि तुपाची विक्री केली. मागणीप्रमाणे खवा, श्रीखंड, पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करतात. २०० लिटरपासून सुरु केलेले दूध संकलन आता सुमारे ७ हजार लिटरपर्यंत वाढविण्यात आले आहे.

वढू बुद्रुक: पुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरुर) येथील सुनील आणि धनश्री या आहेर दांपत्याने शेतीला पुरक जोड व्यवसायाची साथ म्हणून दूध संकलनासह दुग्धजन्य पदार्थ निर्मितीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात पाऊच पॅकिंगमध्ये दूध, दही, लस्सी आणि तुपाची विक्री केली. मागणीप्रमाणे खवा, श्रीखंड, पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करतात. २०० लिटरपासून सुरु केलेले दूध संकलन आता सुमारे ७ हजार लिटरपर्यंत वाढविण्यात आले आहे.

उसन्या पैशाच्या वादातून खुनी हल्ला करणाऱ्याला अखेर अटक

औद्योगिकीरणामुळे वढू बुद्रुक (ता. शिरुर) शिवारात विविध लहान मोठे उद्योग उभे राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे  पारंपरिक शेती कमी होत आहे. मात्र काही शेतकरी अजूनही पांरपरिक शेतीसह पुरक व्यवसाय करत आहेत. यातीलच एक तरुण सुनील आहेर. सुनील यांची पिंपळे जगताप रस्त्यालगत सुमारे १२ एकर शेती आहे. शेती न विकता सुनील यांनी शेतीपुरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुनील यांनी ५ वर्षांपूर्वी उद्योगांना शुद्ध पाण्याचे (आरओ) जार, बाटल्या पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायात जम बसविल्यानंतर शिवारातील शेतकऱ्यांना फायदेशीर व्यवसाय करण्याचा विचार सुनील करत होते. अभ्यास केल्यानंतर एक वर्षापूर्वी आहेर फूड्स नावाने दूध संकलन आणि प्रक्रिया व्यवसाय सुरु केला.

व्यवसायाला सुरुवात
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी शेतकरी, दूध संकलन आणि प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांशी चर्चा करुन व्यवसायाला सुरुवात केली. परिसरात विविध छोट्या मोठ्या उद्योगांची दूध संकलन केंद्रे होती. मात्र प्रक्रिया केंद्र खूपच लांब परिसरात होती. तर संकलन हे एका विशिष्ट ठिकाणी होत असल्याने शेतकऱ्यांना ५ ते १० किलोमीटरवरुन संकलन केंद्रावर दूध द्यायला जावे लागत होते. ही शेतकऱ्यांची समस्या चर्चेतुन समोर आली. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दूध संकलन सुरु केले. त्यामुळे दूध संकलन वाढण्यास मदत झाली. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेतले आणि एजन्सीद्वारे मशिनरी उभारली. व्यवसाय सुरु केल्यानंतर पहिल्या दिवशी केवळ २०० लिटर दूध संकलन झाले होते. ते टप्प्याटप्प्याने आता ७ हजार लिटरपर्यंत वाढले आहे.

कुमावत समाजाच्या प्रवक्ते पदी मनोहर परदेशी

संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित
संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित असून दूध, दही, तुप, लस्सी, ताक तयार केले जाते. त्याचे पॅकिंग देखील मानवी हाताळणी शिवाय स्वयंचलित पद्धतीने होते. उत्पादन दर्जेदार करण्यासाठी संकलन झालेल्या दुधाच्या प्रक्रिये दरम्यान विविध टप्प्यांवर १० विविध चाचण्या केल्या जातात. यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा करण्यात आली आहे.

पत्नीची मोलाची साथ
सुनील यांना व्यवसायात पत्नी धनश्रीची मोलाची साथ आहे. सर्व प्रकल्पाचे व्यवस्थापन त्याच पाहतात. यामध्ये दूध संकलन, प्रयोगशाळेतील विविध चाचण्या, पॅकिंग, स्वच्छता, कामगारांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या त्या पार पाडतात.

ओहरटेक केल्याने दोघा भावांना केली मारहाण

विक्री व्यवस्था आणि अर्थकारण
सध्या ७ हजार लिटर दुधापैकी ५ हजार लिटर दूध अर्धा आणि एक लिटरच्या पाऊच पॅकिंगमध्ये विक्री केले जाते. तर उर्वरित २ हजार लिटर पैकी १ हजार लिटरचे दही आणि १ हजार लिटरचे ताक, लस्सी आणि काही प्रमाणात श्रीखंड आणि तूप केले जाते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी ३० वितरक पिंपरी चिंचवड परिसर आणि शिक्रापूर, कोरेगाव, वडगावशेरी परिसरात आहेत. त्यांच्याद्वारे विक्री होत आहे. दुधाला बाजारभावाप्रमाणे दर दिला जातो.  व्यवसाय नवीन असल्यामुळे भांडवलावर खर्च झाला आहे. त्यामुळे सध्या खर्च वजा जाता महिन्याला ३५-४० टक्क्यांपर्यंत नफा मिळत आहे.

सुन्धा' ब्रॅण्डची निर्मिती
दूध व्यवसाय सुरु करण्यापूर्वीच सुनील यांनी स्वत:च्या आणि पत्नीच्या नावातील इंग्रजी अक्षरांचा मेळ साधत 'सुन्धा' ब्रॅण्डची निर्मिती केली. `सुन्धा` या नावाने सर्व उत्पादनांची विक्री केली जाते.  

वितरक नियुक्तीसाठी विशेष कष्ट
दूध संकलन आणि प्रक्रिया केल्यानंतर वितरणाची मुख्य जबाबदारी आणि आव्हान होते. मात्र व्यवसाय नवीन असल्याने आपला नफा कमीत कमी ठेवत, वितरकांना जास्तीत जास्त नफा देण्याचे नियोजन केले. प्रस्थापित ब्रॅंडपेक्षा आम्ही आमचे कमिशन कमी ठेवल्याने एका वर्षात ३० वितरकांद्वारे विक्री सुरु आहे. यासाठी पाणी वितरणाच्या व्यवसायाचा अनुभव पाठीशी असल्याने शक्य झाल्याचे सुनील यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे परिसरातील २० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

प्रत्येक दिव्याला सूर्य करणारा शिक्षक

गायी खरेदीसाठी मदत
दूध संकलन वाढावे आणि शेतकऱ्यांचाही दुग्ध व्यवसाय वाढावा म्हणून परिसरातील सुमारे १५ शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पैसे देत गायी खरेदी करण्यास मदत करत विश्‍वास निर्माण केला. शेतकऱ्यांना दूध संकलनाची हमी मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची १ ते २ असणाऱ्या गायींची संख्या आता १० पर्यंत वाढली आहे. यामुळे परिसरातील ७०-८० शेतकरी जोडले गेले आहेत. या शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे ७ हजार लिटर दूध संकलन होत आहे.

संकलन: विवेक लोले
कृषी महाविद्यालय, पुणे

Title: Aher couple s leap into the milk business
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे