अन... ९३ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश...

सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये असंख्य नागरिक मयत होत असताना मयत होणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटल मधून कोरोनावर मात करुन आजीच्या मुळ गावी रवाना झाली असून आजीच्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

शिक्रापूर: सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये असंख्य नागरिक मयत होत असताना मयत होणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटल मधून कोरोनावर मात करुन आजीच्या मुळ गावी रवाना झाली असून आजीच्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

संगनमताने कंपनीची अठ्ठावीस लाखांची फसवणूक अन्...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये वाशीम येथील ९३ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह आजी (दि. ११) सप्टेंबर रोजी दाखल झाल्या होत्या. वाशीम येथे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आजी कोरोना बाधित झालेल्या होत्या. त्यांच्या गावी उपचार करणे अशक्य असताना तसेच आजीला ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांच्या ओळखीचे डॉक्टर शिक्रापूर येथे असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी त्या आजीबाईला मोठ्या आशेने शिक्रापूर येथे आणून दाखल केले होते. शिक्रापूर येथे दाखल झाल्यानंतर माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. पवन सोनवणे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. सचिन सपकाळ, डॉ. निखील मोरे यांनी आजीवर उपचार सुरु केले आणि ४ दिवसांनंतर आजी उपचाराला चांगला प्रतिसाद देऊ लागल्या आणि आजी कोरोनामुक्त झाल्या.

भैरवनाथ मंदिरात पुन्हा चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

त्यांनतर आजीला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले. यावेळी माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स व स्टाफ ने आजीवर फुलांचा वर्षाव करत आजीचे स्वागत केले असून आजीच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहे. तर यावेळी बोलताना आमच्या आजीचे आयुष्य संपले. परंतु शेवटचा इलाज म्हणून आम्ही आजीला शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो येथील डॉक्टरांच्या प्रयत्नाने आमच्या आजीला नवसंजीवनी मिळाली असून आम्हाला आमची आजी चांगल्या पद्धतीने घरी जात असल्याचा आनंद वाटत असल्याचे आजीच्या नातेवाईकांनी सांगितले. तर यावेळी बोलताना शिक्रापूर येथील आमच्या हॉस्पिटलमधून अद्याप पर्यंत १७ रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून कोरोना मुक्त होत असलेल्या आजी सर्वात जेष्ठ व ९३ वर्षाच्या आजीला जीवनदान देण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे समाधान आम्हाला असल्याचे माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. पवन सोनवणे यांनी सागितले.

Title: Ann 93 year old grandmother overcame Corona
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे