पराभवामुळे खचुन न जाता पुन्हा उभारी घेणारे अशोक पवार

वाढदिवस विशेष

पक्ष संघटन, पक्ष बांधणीत अशोक पवार हे अव्वल ठरले. २०१९ ची उमेदवारी मिळाली. ज्यांना मिळाली नाही, त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आणि अशोक पवारांना निवडून येऊन द्यायचं नाही, असा चंग बांधला. एका पराभवानंतर अशोक पवारांनी इतिहास रचायला सुरुवात केली होती. या निवडणुकीत सुद्धा इतिहासच रचणार हा विश्वास होता आणि इतिहासच रचला...!

वाढदिवस विशेष  ३० ऑगस्ट

शिरुर-हवेली तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन, सन्माननीय
अ‍ॅड अशोक रावसाहेब पवार
बी.एस्सी.(अ‍ॅग्री,) एलएल.बी.

शिरुर तालुक्याचे भाग्यविधाते तथा सहकाराचे प्रणेते, स्व.रावसाहेबदादा पवार यांच्या प्रगतीचा वारसा जोमाने पुढे नेण्याचं व जपण्याचं काम आमदार अशोक पवार हे करीत आहेत. स्व.रावसाहेबदाद पवार आणि त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी मोठ्या कष्टानं घोडगंगा सह.साखर कारखाना स्थापन केला. अशोक पवारांनी मोठ्या मेहनतीनं, जिद्दीनं, चिकाटीनं आणि संघर्षानं तो नावारुपाला आणला.

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अशोक पवारांची गुणवत्ता हेरली. आणि २००९ ला शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. शिरुर-हवेलीच्या जनतेने ती सार्थ ठरविली. आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आमदार कसा असावा, हे त्यांनी संपूर्ण राज्याला दाखवून दिले. अभिनव आणि भरीव अशा योजना दिल्या. त्याचा राज्याने स्वीकार केला. मतदार संघात 'न भूतो न भविष्यती' अशी विकासकामे केली. जनतेने त्यांना 'कार्यसम्राट आमदार' ही पदवी बहाल केली आणि 'कार्यसम्राट आमदार' म्हणून ते प्रकाशझोतात आले. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अक्षरशः कमाल करुन दाखविली.

२०१४ ला दुसर्‍यांदा पक्षनेतृत्वानं त्यांना उमेदवारी दिली. पण त्यावेळेस देशामध्ये सत्तांतराची लाट निर्माण झाली होती. बदलाचे वारे वाहू लागले होते. आरक्षणाचा मुद्दा उफाळून आला होता. मतदार संघामध्ये व्यक्तिद्वेषाच्या राजकारणाचे पेव फुटले होते आणि मागच्या पाच वर्षांत प्रचंड विकासकामे करुनही पराभव स्वीकारावा लागला. पण पराभवानं खचून जाईल, तो अशोक पवार कसला, हे त्यांनी दुसर्‍याच दिवशी दाखवून दिले. आणि ते स्वतःचं दुःखं, अपयश बाजूला सारुन जनतेच्या सुख-दुःखामध्ये सामील झाले. अपयश आलं असलं तरी जनतेची सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं.

२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सह.साखर कारखान्याची निवडणुक लागली. विधानसभेला पराभव झाल्यामुळे त्यांची पडती बाजू झाली होती. त्यामुळे त्यांच्या पॅनलला उभं राहण्याचं धाडस सहजासहजी कुणी दाखवित नव्हतं. त्यांनी सामान्य माणसं पॅनलमध्ये घेतली. आणि आख्खा पॅनल निवडून आणून इतिहास रचला. एक पराभव काय करु शकतो...? तर इतिहास रचू शकतो. हे अशोक पवारांनी दाखवून दिले. त्यानंतर मतदार संघात झालेल्या सर्वच निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. सर्व संस्थांवर पक्षाचा झेंडा दिमाखात फडकविला.

२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे २०१९ ला उमेदवारी मिळेल का...? अशी अटकळ बांधली जात होती. पक्षांतर गटबाजी उफाळून आली होती. उमेदवारीसाठी रस्सीखेच निर्माण झाली होती. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणायचं ही अशोक पवारांची ठाम भूमिका होती. पक्षांतर विरोधकांनी एकच बाजू लावून धरली होती, की २०१४ ला त्यांचा पराभव झाला आहे. पण एक पराभव इतिहास रचू शकतो, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. पक्षनेतृत्वाच्या ते लक्षात होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला धोका नव्हता. पक्ष संघटन, पक्ष बांधणीत अशोक पवार हे अव्वल ठरले. २०१९ ची उमेदवारी मिळाली. ज्यांना मिळाली नाही, त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आणि अशोक पवारांना निवडून येऊन द्यायचं नाही, असा चंग बांधला. एका पराभवानंतर अशोक पवारांनी इतिहास रचायला सुरुवात केली होती. या निवडणुकीत सुद्धा इतिहासच रचणार हा विश्वास होता आणि इतिहासच रचला...! अशोक पवारांचा पराभव करण्यासाठी ज्यांनी उराला वाळू लावली होती. त्यांना पुरुन उरणं सोपं नसतं. पण हा करिष्मा सुद्धा अशोक पवारांनीच करुन दाखविला.

भल्या-भल्यांच्या बत्त्या केल्या गुल, अशोक पवार लय पाॅवरफुल !!

शब्दांकनः भरत चोरमले

कुंडलिक शितोळे देशमुख (माजी अध्यक्ष, शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी)

 

Title: Ashok Pawar resurfaced without getting exhausted due to defe
प्रतिक्रिया (1)
 
Krishna mane
Posted on 30 August, 2020

अगदी छान लेख लिहिल आहे.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे