शिक्रापूरात रंगू लागले पोलीस निरीक्षकांबाबतचे तक्रार नाट्य
आता निलंबन झाल्यास विरोधी पॅनेल टाकणार ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
शिक्रापूर (ता. शिरुर) या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असताना श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याविरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवीत तावसकर यांच्या निलंबनाची मागणी केली.शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असताना श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याविरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवीत तावसकर यांच्या निलंबनाची मागणी केली असुन निलंबन न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले असताना आता विरोधी शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनेलने देखील प्रशासनाने पोलीस निरीक्षकांची बदली केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले असल्याने पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीबाबतचे नाट्य आता चांगलेच रंगले आहे.
शिक्रापूर पोलीस निरीक्षकांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे जाणूनबुजून आमच्या पॅनेलला त्रास देत असुन राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठींबा देत असल्याबाबतची तक्रार करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली तर निलंबन न झाल्यास संपुर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले असताना गावातील ग्रामविकास आघाडी पॅनेलने देखील राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले असुन तावसकर यांची तक्रार करणारे व्यक्ती गुन्हेगारी स्वरुपाचे असुन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, तर समोरील पॅनेल प्रमुख हे नेहमी पैशाचा वापर करुन मतदारांना दमदाटी करत निवडणुका जिंकत आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार जोरात
शिक्रापूर येथे सभा स्थळामुळे सर्व काही घडलेले असताना पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी वाहतूक कोंडीच्या हेतूने दोन्ही पॅनेलची परवानगी नाकारली असुन मोकळ्या जागेमध्ये सभेला परवानगी देऊ, असे देखील सांगितले असल्याचे म्हटले आहे. तसेच सदर पोलीस निरीक्षकांमुळे आमच्या गावची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडेल असे देखील ग्रामविकास आघाडी पॅनेलचे प्रमुक बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, अरुणदादा करंजे, धैर्यशील मांढरे, बाबासाहेब सासवडे यांसह उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
...म्हणुन राहिले त्याच ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं
पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्यावर समोरील श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत प्रशासनाने कर्तव्यदक्ष अशा निपक्ष आणि निर्भयपणे काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची बदली केली तर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीचे नाट्य चांगलेच रंगले आहे.