कोरोना काळामध्ये देखील भाजपा नेत्यांची कार्यक्रमासाठी गर्दी

गर्दी टाळण्याचे सोडून नेते कार्यक्रमांमध्ये व्यस्त

सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये शासनाने अनेक नियम लादून दिलेले असून शासनाने लादलेले सर्व नियम नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारी साठीच आहेत. आज पर्यंत सर्व पक्षीय नेते देखील कोरोना बाधित झालेले असून कोरोना कोणालाही सोडू शकत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे.

शिक्रापुर: सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये शासनाने अनेक नियम लादून दिलेले असून शासनाने लादलेले सर्व नियम नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारी साठीच आहेत. आज पर्यंत सर्व पक्षीय नेते देखील कोरोना बाधित झालेले असून कोरोना कोणालाही सोडू शकत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. मात्र, असे असताना देखील भारतीय जनता पार्टीचे नेते वरिष्ठ नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.

पत्रकार लक्ष्मणराव फडके यांचं निधन

एकीकडे एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने काही कार्यक्रम घेतल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सर्वत्र वाढत आहेत. मात्र सर्व सामान्यांवर गुन्हे दाखल करणारे पोलीस मात्र नेत्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहेत. शिक्रापूर येथे देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने असाच कार्यक्रम घेण्यात आला असून या नेत्यांना कोरोनाची भीती आहे कि नाही. तसेच गावामध्ये मोठे पोलीस स्टेशन असून देखील पोलिसांना गर्दी दिसली नाही का असा सवाल नागरिकांना पडला आहे.

Title: Even during the Corona period BJP leaders thronged for the
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे