जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद...
करंदीच्या वार्ड क्रमांक ४ मधील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. तर प्रचाराच्या दरम्यान जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी वार्ड मधील प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार दौरा घेतला.करंदी: करंदीच्या वार्ड क्रमांक ४ मधील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. तर प्रचाराच्या दरम्यान जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी वार्ड मधील प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार दौरा घेतला. यावेळी मतदारांनी या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर संपूर्ण वार्ड क्रमांक ४ मध्ये जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या तीनही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांचा आशीर्वाद घेतला आहे.
शिक्रापुरात मतदानासाठी वार्डानुसार जागेचे विभाजन
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक आल्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार असल्याची खात्री यावेळी मतदारांना तीनही उमेदवारांनी दिली आहे. वार्ड क्रमांक ४ मध्ये जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सर्वसाधारण जागेतून बबन उर्फ बबलू सोमनाथ ढोकले, नागरिकांचा मागास प्रवर्गातून पांडुरंग आनंदराव ढोकले, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सुनिता कैलास ढोकले हे तीनही उमेदवार वार्ड क्रमांक ४ आणि संपुर्ण करंदी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार जोरात
मतदारांनी देखील या तीनही उमेदवारांना पसंती द्यावी म्हणुन वार्डमधील प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला. तर जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे तीनही उमेदवार लोकांच्या मनातील आहेत. सर्वसामान्य मतदारांनीच आम्हाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्हा तीनही उमेदवारांना मतदार प्रचंड प्रतिसाद देतील, अशी खात्री पांडुरंग आनंदराव ढोकले यांनी व्यक्त केली आहे.