शिक्रापूर पोलीस निरीक्षकांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
निलंबन न झाल्यास पॅनेल टाकणार ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
शिक्रापूर (ता. शिरुर) या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असताना प्रत्येक विरोधी उमेदवार समोरील उमेदवारावर आरोप करत असतो अशी अवस्था नेहमी असताना मात्र यावेळी शिक्रापूर मधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या विरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवीत तावसकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असताना प्रत्येक विरोधी उमेदवार समोरील उमेदवारावर आरोप करत असतो अशी अवस्था नेहमी असताना मात्र यावेळी शिक्रापूर मधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या विरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवीत तावसकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
हरिषशेठ येवले म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व; नाथाभाऊ शेवाळे
शिक्रापूर (ता. शिरुर) या ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील सर्व पॅनेल प्रमुखांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात बैठक घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला अपयश आले. मात्र, त्यांनतर निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. सदर पोलीस निरीक्षक हे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मदत करत असुन विरोधकांवर दबाव टाकून जाणीवपुर्वक खोटे गुन्हे दाखल करत समाजामध्ये जाणीवपुर्वक आमच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देत दमदाटी करत असल्याचे आरोप शिक्रापूर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने केले आहेत.
शिक्रापूर गावात गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात ज्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सोसायटी यांच्या निवडणुका झाल्या. त्या सर्व निवडणुकांच्या प्रचार सभा आजपर्यंत शिक्रापूर ग्रामपंचायतच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये झाल्या असल्याचे म्हणत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल यांनी ग्रामपंचायत समोरील मोकळ्या जागेत प्रचार सभा घेण्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, शिरुर तालुका तहसीलदार यांच्या लेखी आदेशामुळे या प्रचार सभेला परवानगी शिक्रापूर पोलिसांनी दिली नाही. परंतु पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी जाणून-बुजून सदर परवानगी नाकारली असल्याचा आरोप करत त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कारवाई न झाल्यास गावच्या संपुर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने लिहिलं आहे.
पोलिसांकडून फक्त आमच्याच पॅनलवर अन्याय; रामराव सासवडे
शिक्रापूर मध्ये सर्व सभा ग्रामपंचायत समोरील जागेत होत असताना मात्र सध्या पोलिसांकडून जाणीवपूर्वक आमच्या परवानग्या नाकारल्या जात असुन आमची प्रत्येक विषयात अडवणूक होत आहे. पोलिसांकडून आम्हाला कायद्याचे संरक्षण आम्हाला मिळत नसल्याने आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे माजी सरपंच रामराव सासवडे यांनी सांगितले.
पत्नी सोबत संबंध असल्याच्या संशयावरुन युवकावर सपासप वार
माझ्यावरील आरोप खोटे; उमेश तावसकर
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी माझ्या विरोधात झालेले सगळे आरोप खोटे असुन मी या आरोपांच खंडन करतो, तहसीलदारांच्या आदेशानुसार सदरील जागेत सभा घेतल्याने पुणे अहमदनगर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदर ठिकाणी सभा घेऊ नये, असे आदेश शिक्रापूर पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे या सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ३० ग्रामपंचायतच्या निवडणूक होत आहे. परंतु आचार संहितेचा भंग झाल्याचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.