आमच्याविषयी

नमस्कार,
             इंटरनेटमुळे जग एकदम जवळ येऊन ठेपले असून, खेड्यापाड्यांमध्येही आता इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे. त्या पुढेही जाऊन आता अनेक युवक मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करताना दिसतात. घरबसल्या गावापासून ते जगातील कानाकोपऱ्याची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे कळविण्यात आनंद होतो की, आम्हीही शिरूर तालुक्‍याचे www.shirurtaluka.com या नावाने संकेतस्थळ सुरू केले असून 26 मे 2011 रोजी इंटरनेट विश्‍वात पदार्पण केले आहे.
या संकेतस्थळावर दररोज तालुक्‍यातील बातम्या वाचावयास मिळत आहेत. शिवाय तालुक्‍यातील सर्व गावांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावांची संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तालुक्‍यातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर तालुक्‍यातील धार्मिक, राजकीय, शैक्षणिक माहिती व घडामोडींची उपलब्ध झालेली माहिती संकेतस्थळावर देत राहणार आहोत. मनोरंजन म्हणून चित्रपट सृष्टीतील विविध लेख, भविष्य, शेती विषयक लेख सतत उपलब्ध करून देणार आहोत. तालुक्‍यातील निवडक फोटोंची गॅलरीही पहावयास मिळणार असून, विविध व्हिडिओही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. शिवाय ट्‌वीटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेकांना एकत्रित करण्यात येणार असून, विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.

संकेतस्थळ खऱ्या अर्थाने परिपूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा संकेतस्थळाच्या माध्यमातून शिरूर तालुक्‍याची माहिती जगभर दिसणार आहे. आपल्या काही सूचना असतील, काही माहिती उपलब्ध असेल, संकेत स्थळासाठी फोटो पाठवायचे असतील तर आमच्याकडे पोचवा. तुम्ही केलेल्या सूचनांचे स्वागतच आहे. तुम्ही पाठविलेली योग्य माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल.

धन्यवाद!
सतीश केदारी -  8805045495
तेजस फडके - 9766117755 / 9423020103
सौ. दीपाली शेळके- 9822555522
शिरूरतालुका.कॉम, ईश्वरी प्रकाशन, पुणे.
ई-मेल - shirurtaluka@gmail.com

(टीप- या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही, तसेच या वेबसाईटवर प्रसिध्द झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादीत राहील.
कायदेशीर सल्लागार- ऍड. विकास कुटे (9730307373), रांजणगाव गणपती)

  • 1