ताज्या बातम्या -  संकेतस्थळाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करा! |  शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या- |  संकेतस्थळाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या... |  शिरूर तालुक्‍यात पाणी पंचायतीची स्थापना  |  'शिरूर तालुका डॉट कॉम'चे दुसऱया वर्षात पदार्पण |  'शिरूर तालुका डॉट कॉम'चे विभागीय कार्यालय सुरू  |  'शिरूर तालुका डॉट कॉम' हे संकेतस्थळ प्रेरणादायी- पोटे |  रांजणगाव- खासदारांच्या हस्ते SMS सेवेचे उदघाटन! |  शिरूर तालुक्यातील महत्त्वाची छायाचित्रे |  'शिरूर तालुका डॉट कॉम युवा मंच'ची स्थापना! |  'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या मातेला आदर्श पुरस्कार! |  'शिरूर तालुका डॉट कॉम'तर्फे पुरस्कार प्रदान ! |  'शिरूर तालुका डॉट कॉम'द्वारे यापुढे Video News ! |  'शिरूर तालुका डॉट कॉम'चे चौथ्या वर्षात पदार्पण! | 

राज्यात तीनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात केवळ तीनच शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी केला.

आणखी >>

‘साखर कारखान्यांना २ हजार कोटी ही शेतकऱ्यांची थट्टाच’

राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला लागले आहेत.

आणखी >>

अवकाळीग्रस्त शेतक ऱ्यांना भरपाईत ५० टक्के वाढ

अवकाळी पावसाने मराठवाडय़ात गेल्या तीन महिन्यांत २०६ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, भरपाईबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असलेली उलटसुलट विधाने तसेच भूसंपादन विधेयक यामुळे शेतकऱ्यांमधील असंतोष तीव्र होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आतापर्यंतचे निकष बदलून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईत ५० टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.

आणखी >>

बदलत्या हवामानामुळे शेतकरी, बागायतदार हैराण

यंदाच्या पावसाळी हंगामाला सुरुवात झाल्यासारखे गेल्या काही दिवसांतील बदलते हवामान, ऋतुमानाला शेतकरी, बागायतदार वैतागले आहेत.

आणखी >>

‘एफआरपी’प्रमाणे भाव नसल्याने ऊसउत्पादक अडचणीत

साखर सहसंचालक नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रात ५ जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५११ कोटी २८ लाख ३६ हजार रुपये थकीत आहेत. २०१०-११ पासूनचा हा आकडा असला, तरी २०१४-१५ या वर्षांतच ४९१ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी आहे.

आणखी >>

शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळणार

येत्या दोन वर्षांत विदर्भात वेकोलीच्या २४ कोळसा खाणी सुरू केल्या जाणार असून, शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी पैनगंगा कोळसा खाण प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ही खाण सुरू झाल्यानंतर या भागातील स्थानिकांना रोजगार तर प्राप्त होईल.

आणखी >>

राज्यातील गारपीटग्रस्तांना १ एप्रिलपासून मदत

अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाच्या मदतीने १ एप्रिलपासून मदत दिली जाईल.

आणखी >>

नागपुरात गारपीट

राज्यात विविध भागांत गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना रविवारी नागपूर शहरालाही वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला.

आणखी >>

अवकाळीच्या जोडीला गारपीट!

गेल्याच आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता गारपिटीने डोके वर काढले आहे. रविवारी रात्री मराठवाडय़ाला गारपिटीने झोडपून काढले.

आणखी >>

शेतीखालील जमीन उद्योगासाठी संपादन केली जाणार नाही

सिंचन आणि शेतीखालील जमीन औद्योगीकरणासाठी संपादन केली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी दिली.

आणखी >>

आता कृषी सहायक शेतकऱ्यांसाठी कायम उपलब्ध

ग्रामसेवक व तलाठी या पूर्णवेळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबतच आता कृषी सहायक हा देखील पूर्णवेळ कर्मचारी म्हणून शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे.

आणखी >>

शेतकऱ्यांना यापुढे सोलार पंपांचीच जोडणी

शेती पंपासाठी दिल्या जाणाऱ्या विजेपोटी सरकारवर वर्षाला सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा बोजा पडतो. शेतकऱ्यांना स्वस्तात देण्यात येणाऱ्या विजेचा आकार उद्योग तसेच व्यावसायिक आस्थापनांना महागड्या दरात वीज देऊन वसूल करण्यात येतो.

आणखी >>

पिके वाचविण्याची शेतक:यांची धडपड!

बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत.

आणखी >>

बळीराजा धास्तावला

तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. काळय़ा आईच्या या चाव्यामुळे गावेच्या गावेच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

आणखी >>

अपु-या पावसामुळे खरिपाची शेती धोक्यात

अपुऱ्या पावसाचा फटका बसल्याने, देशात खरीप पिकांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचा इशारा खुद्द केंद्रीय कृषि राज्यमंत्री संजीवकुमार बालियां यांनी दिला आहे.

आणखी >>

शेतीला २४ तास वीजपुरवठ्यासाठी पाचशे कोटी

गुजरातच्या धर्तीवर शेती आणि बिगरशेतीच्या ग्राहकांना २४ तास अखंड वीजपुरवठा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्यासाठी प्रस्तावित योजनेसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

आणखी >>

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष वाहिनीची घोषणा

देशातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच २४ तास चालणारी विशेष वाहिनी सुरू करण्यात येणार आहे.

आणखी >>

पाऊणशे तालुक्यांत पेरण्या रखडल्या; ६८३ गावे-वाडय़ांना ५७२ टँकर सुरू

पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ात भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. टंचाई कालावधीत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम शुक्रवारी (दि. ४) औरंगाबाद येथे येणार आहेत.

आणखी >>

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांसाठी कृती आराखडा

बदलत्या हवामानाची व पावसाच्या स्थितीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हवामान विभाग, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे यांच्या समन्वयातून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

आणखी >>

जनावरांनी तारा, दाभण गिळण्याचे वाढते प्रकार

पुणे : ग्रामीण भागात गायी, म्हशी, बैल अशा जनावरांनी चार्‍यामधून लोखंडी तारा किंवा दाभण गिळण्याचे प्रकार वाढल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आले असून अशा बाबतीत पशुपालकांनी जिल्हा परिषदेने उपलब्ध केलेल्या एक्स रे सारख्या आधुनिक उपचारांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी.विधाटे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की चार्‍यात चुकून आलेल्या तारा किंवा सुतळीला ओवलेली दाभण जनावरांच्या खाद्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर तालुक्याच्या विशिष्ट भागात लोहचुंबकाव्दारे अशा तारा,दाभण काढण्याचा दावा करणारे शेतकर्‍यांच्या अडचणीचा फायदा घेऊन पैसे कमावत आहेत.जिल्हा परिषदेने पिंपळवंडी आणि ऊरूळीकांचन अशा दोन ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खास एक्स रे यंत्रे उपलब्ध केली आहेत.केवळ ५0 रूपये शुल्क आकारून ही सेवा दिली जाते.अशा जनावरांनी गिळलेली वस्तु एक्स रे मध्ये त्वरित दिसू शकते आणि जनावरांवर पुढील उपचार करून त्यांना दिलासा दिला जाऊ शकतो.
ते म्हणाले की जुन्नर तालुक्यात जनावरांच्या शेणापर्यंत लोहचुंबक घालून तारा काढण्याचा दावा करणारे फसवणूक करीत असून तशा तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. अशा व्यक्ती २000 रूपये घेत आहेत.पशुपालकांनी अशा अशास्त्रीय उपायांना बळी पडण्याऐवजी शास्त्रशुद्ध उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.पिंपळवंडी आणि ऊरूळीकांचन येथील एक्स रे यंत्रांच्या सुविधेचा लाभ गेल्या वर्षभरात ७0 जनावरांना झाला आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून ही यंत्रे गतवर्षी बसविण्यात आली आहेत.
(प्रतिनिधी)

आणखी >>

आता रोबोट करणार पिकांवर फवारणी

मनीष चंद्रात्रे, जळगाव
काही तरी वेगळे संशोधन करून त्याचा उपयोग समाजातील तळागाळापर्यंत व्हायला पाहिजे, असा उद्देश बहुतांश तरुणांचा असतो. त्यानुसार महाविद्यालयात शिक्षण घेताना अनेक तरुण मुले अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या उपकरणांचा शोधात असतात, असाच एक शोध बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई अँण्ड टी.सी. शाखेच्या विद्यार्थ्यांनी लावला आहे. या विद्यार्थ्यांनी चक्क ‘पिकांवर किटकनाशक फवारणी करणारा रोबोट’ तयार केला आहे.
आजही आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पिकांवर किटकनाशक फवारणी करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांना मजूर मिळत नाही. जे मजूर फवारणीचे काम करतात; त्यांच्या शरीरावर रासायनिक फवारणीचा विघातक परिणाम होतो. त्यापार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना सोयीचे व्हावे व पीक फवारणीसाठी शेतकर्‍यांचा खर्च कमी होण्यासाठी बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई अँण्ड टीसी शाखेतील केदार देशमुख, अक्षय भावसार, प्रिया येल्लारे या विद्यार्थ्यांनी पिकांवर फवारणी करणारा रोबोट तयार केला आहे.
रोबोटचा नेमका उपयोग प्रा.एस.आर.सुरळकर व प्रा. डॉ. उमेश भदादे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ३ फूट उंच अँल्युमिनीअम धातूच्या पट्टीपासून चौकोनी सांगाडा तयार केला. सोयाबीन पिकांवर सर्वात जास्त किटक बसत असल्यामुळे सोयाबीनच्या शेतात विद्यार्थ्यांनी प्रयोग करून पाहिला. या रोबोटवर एक सौर प्लेट बसविण्यात आली आहे. सूर्याची किरणे सौर प्लेटवर पडल्यानंतर रोबोट चार्ज होऊन १00 मीटर क्षेत्रात रोबोट कीटक नाशकांची फवारणी करू शकणार आहे. शेतात एका ठिकाणी थांबूनदेखील शेतकर्‍यांना रिमोटने ऑपरेट करून संपूर्ण शेतात फवारणी करता येणार असल्याचा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी प्रयोगातून सिद्ध करून दाखविला आहे. एकदाच होईल ‘खर्च’ विद्यार्थ्यांना रोबोट तयार करण्यासाठी सुमारे २२ हजार रुपयापर्यंत खर्च आला आहे. सूर्याच्या किरणांनी चार्जिंग झाल्यानंतर रोबोट शेतात एक ते दीड तास फवारणी करू शकणार आहे.शोध प्रकल्प स्पर्धेत यश बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या शोध प्रकल्प २0१४ स्पर्धेत हे उपकरण विशेष लक्षवेधी ठरले होते. या स्पर्धेत परीक्षकांनी या उपकरणाला प्रथम क्रमांक दिला आहे.

आणखी >>

उन्हाळी आवर्तनाने शेतकर्‍यांना दिलासा!

यडगाव : कुकडी प्रकल्पांतर्गतील सर्व धरणात या वर्षी चांगला पाणीसाठा असल्यामुळे रब्बीची दोन आवर्तने पूर्ण झाली असून, आता उन्हाळी आवर्तन सोडले आहे.
सध्या येडगाव धरणात माणिकडोह धरणातून नदीपात्रात १२00 क्युसेक्स, पिंपळगाव जोगे धरणातून ५00 क्युसेक्स, तर डिंभा डाव्या कालव्यातून २00 कुससेक्स पाणी येत आहे. तर, डिंभा धरणातून डाव्या कालव्यांतर्गत सोडलेल्या पाण्यांतर्गत उजव्या कालव्यास १८0 क्युसेक्स व घोड वितरिकेला १00 क्युसेक्स पाणी सोडले आहे. उर्वरित मीना सिंचन कालव्यास २ एप्रिलपासून पाणी सोडण्यात येत आहे. तर, पिंपळगाव जोगे धरणातून डाव्या कालव्यास २ एप्रिलपासून २00 क्युसेक्सने पाणी सोडले आहे.
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून रब्बीची दोन आवर्तने सोडण्यात आली होती.
पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले. हे आवर्तन २५ दिवसांतच पूर्ण झाले, तर दुसरे आवर्तन फेब्रुवारी महिन्यात सोडले ते आवर्तन ३४ दिवस चालले. त्यानंतर पुन्हा सध्या दि. ७ पासून कुकडी डाव्या कालव्यास उन्हाळी आवर्तनांतर्गत पाणी सोडण्यात आले असून, ते ३0 दिवस चालणार असल्याचे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी सांगितले.(वार्ताहर)

आणखी >>

पाच हजार शेतकरी वार्‍यावर

नारायण जाधव, ठाणे
शहरातील बाळकुम, कोलशेत, माजिवडा, ढोकाकी या गावांतील शेतकर्‍यांच्या सुमारे अडीच हजार हेक्टर शेतजमिनीचे देशात सर्वप्रथम १९५६ साली औद्योगिक प्रयोजनासह राष्ट्रीय सुरक्षा विभाग, मुंबई महापालिका पाइपलाइन, राज्य व राष्ट्रीय रस्त्यांसाठी संपादन झाले.
यात कॅटलिस्ट कब्बूर इंड, भारत फर्टिलायझर, ध्रुव वुलन मिल, रघुनंदन, वाडको, कलरकेम, बायर इंडिया, बोरिंगगर मॅनहॅम, नॅशनल डाइज, आयए अँण्ड आयसी अशा कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, आजघडीला यातील बहुतांश कंपन्यांच्या जागेवर बिल्डरांचे उत्तुंग टॉवर्स उभे आहेत. लॅण्ड अँक्टच्या कलम ४४ अ चे उल्लंघन केल्याने दोषींवर गुन्हे दाखल करण्याऐवजी संबंधितांना त्या जमिनी विकण्यास किंवा इमारती बांधण्यास देण्याआधी मूळ मालकांना त्या परत करावयास हव्या होत्या. तसे झाले नसल्याचा आरोप ठाण्यातील शेतकरी संस्थेचे अध्यक्ष सी. बी. पाटील यांनी केला.
संबंधित कंपन्यांनी संपादित जमिनीचे मुख्य प्रयोजन निरुपयोगी ठरवले असल्याने लॅण्ड अँक्ट १८९४ च्या कलम ४ अन्वये त्यांचे संपादन रद्द करून ती कलम ५ अन्वये नैसर्गिक न्यायाच्या संधीने किंवा कलम ३२ (२) अन्वये किंवा १९९९ पुनर्वसन अधिनियम १७ अन्वये मूळ मालकांना किंवा त्याच्या वारसाला संपादित जमिनी परत कराव्यात किंवा शक्य नसल्यास त्यांना टीडीआर द्यावा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी शासनदरबारी लावून धरली. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे चार गावांतील साडेचार ते पाच हजार शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आणखी >>

आमची पिके वाचवा हो!

वडगाव मावळ : शेतकर्‍यांना वीज न वापरता लाखो रुपयांची शेती पंपाची बिले देण्यात आली आहेत; तसेच त्यांना शेतीपंपासाठी वीजजोड दिले जात नसल्याने शेतकर्‍यांची पिके व फळझाडे करपून जात आहेत. वीजजोड देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना काम द्या, अशी सक्ती करतात. काही अधिकारी तर स्वत:चे ठेके घेतात, अशी तक्रार शेतकर्‍यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंताकडे केली आहे. शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीपंपाची बिले वाढीव पद्धतीने दिली आहेत. त्यात ज्या शेतकर्‍यांचे विद्युत मीटरच नाही. त्या शेतकर्‍यांना बिले दिली आहेत. शेतीपंपासाठी लागणार्‍या वीजजोड व रोहित्र यंत्र कामाचा ठेका आहे. त्यांच्या अंतर्गत त्या भागांतील शासकीय ठेकेदारांना कामाचे आदेश दिले आहेत. अधिकार्‍यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे शेतकर्‍यांची कामे अपूर्ण आहेत. कर्मचारी कार्यालयातील कामकाजापेक्षा इतर कामाकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे नागरिकांना कर्मचारी कार्यालयात भेटत नाहीत. त्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कार्यालयातील काही अधिकारी ठेकेदार बनले आहेत. तसेच काहीजण त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेका द्यावा, यासाठी सक्ती
करत आहेत. (वार्ताहर)

आणखी >>

२४ लाख शेतकर्‍यांची पिके ‘गार’द

पुणे : अस्मानी संकटाचा राज्यातील सुमारे २३ लाख ९८ हजार शेतकर्‍यांना फटका बसल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. गेल्या दीड महिन्यांत गारपीट व अवकाळी पावसाने बाधित झालेले क्षेत्र देखील १७ लाख ९६ हजार हेक्टरवर पोचले आहे.
बुधवारपर्यंत गारपीट व अवकाळी पावसाने हानी झालेल्या क्षेत्र १४ लाख ९६ हजार १0२ हेक्टर इतके होते. हरभरा, ज्वारी, गहू, भाजीपाला, कांदा, मका, ऊस, भुईमूग, केळी, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, पपई, आंबा, मोसंबी या पीकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोकण विभागातील चार जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्हे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सापडले आहेत.

च्१५ दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या गारपिटीचे संकट राज्यावरून दूर झाले आहे. राज्यात कोठेही गारपीट होणार नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. मात्र, पुढील ४८ तासांत कोकण वगळता राज्यभर अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आणखी >>

रब्बी पिकांचे लाखोंचे नुकसान

कापूरव्होळ : काल (दि. १२) संध्याकाळी ६.४५ ते रात्री ८.३0पर्यंत मुसळधार पाऊस, प्रचंड वेगाने वाहणारा वारा व गारा हे निसर्गाचे आकांडतांडव देगाव, नायगाव, कांबरे, कांदी, कामथडी, नसरापूर तसेच पंचक्रोशीतील व कापूरव्होळ ते सारोळा परिसरातील नागरिकांनी अनुभवले.
या वेळी अचानक काळेकुट्ट ढग जमा होऊन काही क्षणांतच पाऊस पडला. पावसाच्या अगोदरच प्रचंड सोसाट्याचा वारा, टपटप पडणार्‍या गारा, नंतर पाऊस अशा क्रमाने या पावसाच्या रौद्ररूपाचा अनुभव नागरिकांनी घेतला. सुरुवातीला हा किरकोळ स्वरूपाचा अवकाळी पाऊस असेल, असे वाटत होते; पण काही क्षणांतच पावसाचा जोर इतका वाढला, की रस्त्यावरून सर्वत्र पाणीच पाणी वाहू लागले.
प्रचंड वादळामुळे या गावांतील रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. झाडांच्या फांद्या व पानांमुळे रस्त्याचे स्वरूप हिरवेगार व पांढरेशुभ्र दिसत होते. दोन तासांच्या वादळी पावसामुळे चेलाडी ते सारोळा राष्ट्रीय महामार्गावर असणारी होर्डिंग पूर्णपणे फाटून, उडून गेलेली होती. काही ठिकाणचे पॉलिहाऊसचे कागद फाटले होते. काहींच्या घरांवरची कौले उडून गेली, कौले फुटली.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरीवर्गाची एकच तारांबळ उडाली. रब्बी धान्य, वाळत घातलेले गोवर्‍या, लाकडे- सरपण, गवताच्या गंजी, कडब्याच्या गंजी पूर्णपणे भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. काही शेतकर्‍यांनी ज्वारीपिके काढायला नुकतीच सुरुवात केली. अशा वेळेत कणसाला लगडलेले दाणे जमिनीवर पडून शेतीच्या शेती ज्वारी आडवी पडून त्यावर माती बसून शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले. (वार्ताहर)

४पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा भिजला, तर गहू आणि हरभर्‍याचे पीक जागेवरच आडवे झाले होते. या पावसामुळे या भागातील काही गावांतील वीज गायब झाली. चाकरमान्यांची प्रचंड धावपळ झाली. कैर्‍यादेखील गळून पडलेल्या दिसल्या. भाजीपाल्याची पिके हातातून गेली. या पावसाने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घासदेखील हिरावून नेला आहे.

वाटाण्याचे पीक गेले
कांबरे खे.बा. (ता. भोर) येथील उत्तम कोंढाळकर यांच्या २ एकर शेतातील वाटाणा जमीनदोस्त झालेला आहे. वाटाण्याला ४0 ते ५0 रुपये किलो याप्रमाणे भाव असून, त्यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. याच्या पंचनाम्याकडे प्रशासनाने पाठ फिरविली आहे, असे शेतकरी उत्तम कोंढाळकर यांचे म्हणणे आहे. मला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

आणखी >>

रब्बी पाण्यात!

नारायणगाव / बेल्हा : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील १३ गावांमध्ये प्रचंड गारपीट व पाऊस होऊन सुमारे १२00 हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे १00 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील साकोरी, निमगाव सावा, रानमळा, झापावडी, औरंगपूर, बेल्हा, आणे, मंगरूळ, इनाममळा, तट्टूमळा, नेहरमळा या भागात काल (दि. ९) दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पाऊस व गारपीट झाली. अर्धा तास चाललेल्या गारपिटीत डाळिंब, केळी, द्राक्ष, भुईमूग, कांदा व टोमॅटो, गहू, ऊस या पिकांचे प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाला विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार वल्लभ बेनके, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘भीमाशंकर’चे अध्यक्ष देवदत्त निकम, जि. प. सदस्या आशाताई बुचके, शरद चौधरी, मकरंद पाटे, अशोक खांडेभराड, तहसीलदार प्रल्हाद हिरामणी व विविध पदाधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)

शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या आपत्कालीन संकटाला निवडणूक आचारसंहिता आडवी येणार नाही. संबंधित अधिकार्‍यांना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी

आणखी >>

वातावरणाचा पिकांना फटका

मावळ तालुका : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकर्‍यांची धावपळ

गहुंजे : गहुंजे व पंचक्रोशीतील अनेक शेतकर्‍यांनी खरिपातील भुईमूग व सोयाबीन पिकांची काढणी केली. तिथेच गव्हाची लागवड केली होती. भुईमूग निघण्यापूर्वी सुरुवातीला ज्या शेतकर्‍यांनी गव्हाची लागवड केली होती, अशा शेतकर्‍यांच्या गहू पिकाची कापणी सुरू झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत हवामान बदलामुळे राज्याच्या विविध भागांत गारपीठ व अवकाळी पाऊस होत असल्याने गहुंजेतील शेतकर्‍यांनी गहू कापणीला सुरुवात केली आहे. पावसाच्या भीतीने कापलेला गहू शेतातून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच ज्यांनी भुईमूग पीक, गव्हाची लागवड केली आहे. त्यांचा गहू कापणीला अद्याप एक महिना अवधी लागणार आहे. त्यामुळे गव्हाला पाणी देण्याची लगबग दिसत आहे. तसेच गव्हाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी केली जात आहे. (वार्ताहर)
उर्से : बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत आहे. ढगाळ हवामान, कधी उन्ह, तरी कधी गारवा यामुळे टोमॅटो, गहू, वांगी, झेंडू, भेंडी, मेथी, कोथिंबीर या पिकांना फटका बसला आहे. या बदलत्या हवामानामुळे तीन ते चार वेळा औषधांची फवारणी करावी लागत आहे.
मात्र, सध्या काढून ठेवलेल्या हरबरा, मसूर, वाटाणा हे पिके वाया जावू नय,े म्हणून शेतकर्‍यांनी शेतातच काढून प्लॅस्टिक कागदाने झाकून ठेवली आहे. वीट उद्योजकांची हीच अवस्था आहे. सध्या तयार केलेल्या विटा दररोज हुलकावणी देणार्‍या पावसामुळे झिजू नये यासाठी त्या झाकून ठेवल्या असून, नवीन विटा तयार करण्याचे कामही काही उद्योजकांनी थांबविले आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाची हुलकावणी व बदलते हवामान शेतकर्‍यांना त्रासदायक व नुकसानकारक ठरत आहे.
पवनानगर : बदलत्या वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वर्षी थंडी चार महिने कायम राहिल्याने गव्हाचे पीक जोमात होते. उत्पादनामध्ये १५ ते २0 टक्क्यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांस कृषी अधिकार्‍यांनी व्यक्त केली होती.
मात्र गेल्या आठ दिवसांत कधी थंडी तर कधी गरम या बदलत्या वातारणामुळे गव्हाच्या पिकावर मोठय़ा प्रमाणात तांबेरा पडला असून त्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी योग्य त्या औषधाची माहिती ताबडतोब द्यावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. तर टोमॅटो, मिरची, काकडी, या पिकांवरती देखील बुरशीचे रोग निर्माण झाले आहेत. दररोज बदलणार्‍या हवामानामुळे शेतकरी चिंतेत असून वातावरणाच्या बदलानुसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जावे, अशी अपेक्षा शेतकरी गटाचे अध्यक्ष विष्णू आडकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

बदलत्या हवामानामुळे मावळ तालुक्यातील पिकांवर प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पवनानगर परिसरात गव्हाचे तांबेरापासून संरक्षण होण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी सुरू आहे. उर्से परिसरात पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
मावळ तालुक्यातील सांगवडे, साळुंब्रे व गहुंजे पंचक्रोशीत गव्हाच्या कापणीला सुरुवात झाली आहे.

गव्हावर तांबेर्‍याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल
वीटभट्टय़ांचे काम बंद असल्याने मजूर बेरोजगार
काढलेली पिके भिजू नयेत यासाठी शेतकर्‍यांची धावपळ
कृषी विभागाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज

> वीट उद्योजकांची हीच अवस्था आहे. सध्या तयार केलेल्या दररोज पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे विटा झिजू नये यासाठी त्या झाकून ठेवल्या आहेत. नवीन विटा तयार करण्याचे कामही काही उद्योजकांनी थांबविले आहे.
> गेल्या आठ दिवसांत कधी थंडी तर कधी गरम या बदलत्या वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर मोठय़ा प्रमाणात तांबेरा पडला असून त्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी योग्य त्या औषधाची माहिती ताबडतोब द्यावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

आणखी >>

कांद्याचे वजन अर्धा किलो

राजगुरूनगर : येथील शेतकरी तुकाराम लक्ष्मण रोडे (रा. तुकाईची भांबुरवाडी, राजगुरुनगर) यांनी वयाच्या ८0व्या वर्षी तरुण शेतकर्‍याला लाजवेल, असे ३0 गुंठे जमिनीत कांद्याचे पीक जोमात आणले आहे. त्यांच्या एका कांद्याचे वजन अर्धा किलोच्या आसपास भरत आहे. त्यामुळे परिसरात त्यांच्या या कामाची चर्चा परिसरात सुरू आहे.
त्यांनी पुण्यातील ‘ओशो’ आश्रम शेजारी फळांची गाडी लावली होती. मात्र शेतीच्या ओढीपायी त्यांनी फळाच्या गाडीला राम-राम ठोकत शेती करण्यासाठी आपले मुळ गाव भांबूरवाडी गाठले. यावर्षी त्यांनी कांद्याचे पीक घ्यायचे ठरवले. परंतु यंदा परिसरात दाचे कांद्याचे पीक अतिशय त्रासदायक होते, कारण अवेळी पडणारा पाऊस त्यामुळे कांद्यावर ‘मावा’ रोग पडला.
त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना कांद्याचे उत्पादन कमी मिळाले. पण तुकाराम रोडे यांनी वेळेवर औषधे फवारणी देऊन अवघ्या ३0 गुठ्ठय़ांमध्ये जोमात पीक आणले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ३0 गुठ्ठय़ांमध्ये जवळपास २५0 पिशवी कांद्याची निघेल आणि बाजारभावरून अंदाजे दीड लाख रूपये उत्पन्न होईल. (वार्ताहर)

आणखी >>

शेततळी ठरली वरदान

खोरला फुलल्या फळबागा : शेतकर्‍यांची चिंता मिटणार

खोर : खोर परिसरात शेतकर्‍यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी मार्ग काढत शेततळ्यांच्या जोरावर फळबागा फुलविल्या आहेत.
दौंड कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत खोरच्या खोर्‍यात शेततळी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत परिसरात मोठय़ा प्रमाणात शेततळी उभारण्यात आली आहेत. यासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात आले होते. या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीला विशेषत: फळबागांना मोठी उभारी मिळत आहे.
येथील शेतकरी बाळासाहेब लवांडे म्हणाले की, माझ्या १२ गुठंयात एक असे दोन शेततळयांवर वीस लाख व तीस लाख लीटर पाणी क्षमतेचे दोन शेततळी असल्याने या शेततळयांवर अवलंबून राहून डाळींबाची २000 झाडे, अंजीराची ४५0 झाडे तसेच कांदा, उस, गहू इत्यादी पिके घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
आज पर्यंत पाणी नियोजनासाठी शेततळ्यावरुन ठिबक सिंचन
करुन त्याच्या माध्यमातून
शेती फुलवून डाळींबाचे ८ लाख
रुपये तर अंजीराचे ४ लाख रुपयाचे भरघोस डरडोही उत्पन्न निघाले आहे.
या भागातील शेतकरी संदीप अडसूळ, भाउसाहेब चौधरी, मोहन डोंबे, हनुमंत चौधरी, विठ्ठल चौधरी, दिपक धोका यांनी देखील या भागामध्ये शेततळी उभारली आहे. (वार्ताहर)

खोर परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास म्हणावा तितका झालेला नाही. या भागाची दुष्काळाची ओळख बदलण्यासाठी व टंचाईच्या काळात पाण्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कृषी विभागाने शेततळी तयार केल्याने या भागातील फळधारक शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.
- बाळासाहेब लवांडे, शेतकरी

दुष्काळी ओळख मिटणार

दरवर्षी दुष्काळाच्या कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होत असते, यामुळे शेतकर्‍यांना फळबागा जगविणे कठीण होत होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत शेततळय़ांना अनुदान दिले, यामुळे पाणी नियोजन होऊन ठिबक सिंचनच्या माध्यमातून फळबागांना जीवदान मिळाले आहे, यामुळे खोरची दुष्काळी ओळख मिटणार आहे.

आणखी >>
  • 1

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये 'डीजे' बंदीवरील निर्णय योग्य आहे काय?
 होय
 नाही
 माहित नाही