आदर्श शिक्षक पुरस्कार कामचुकार शिक्षकांनाच?

रांजणगाव गणपती, ता. १७ ऑक्टोबर (पोपट पाचंगे)- शिरूर पंचायत समितीच्या वतीने नुकतेच देण्यात आलेले आदर्श शिक्षक पुरस्कार हे कामचुकार शिक्षकानांच देण्यात आल्याची चर्चा असली तरी यात मोठी ‘वशिलेबाजी’ झाली असल्याचीही प्रातिक्रिया तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमधुन उमटत आहे.   

तालुक्यातील २६ केंद्रामधून ४६ प्राथमिक शिक्षकांना पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. मागील वर्षीचे द्यावयाचे परंतु रखडलेले पुरस्कारही तब्बल दोन वर्षांनी देण्यात आले. शिक्षकांच्या शैक्षणिक कामाचा व गुणवत्तेचा कोणताही विचार न करता केवळ तालुक्यातील पदाधिकारयांशी जवळचे संबंध असणारया बहुतांश शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी शिक्षकांकडून तालुका शिक्षण विभागाने प्रस्ताव मागविल्यानंतर शिकविण्याचे कार्य अतिशय चांगले करणारया व आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवॄत्ती परिक्षेत सर्वाधिक आणणारयांसह अन्य शिक्षकांनी आपले प्रस्ताव सादर केले. यामध्ये आपलीच वर्णी लागावी म्हणून संबंधित पंचायत समितीच्या सदस्यांची शिफारस त्यासाठी महत्वाची मानण्यात आली.

सदस्यांनीही आपल्याच मर्जीतील शिक्षकांची नावे यात पुढे केल्याचे दिसून आले. त्यात अनेक जण तर अध्यापन करताना कामचुकारपणा करणारे, कोणत्याही परिक्षेत गुणवत्ता यादीत कधीच एकही विद्यार्थी न आलेल्या व पंचायत समितीच्या पदाधिकारयांशी घनिष्ठ संबंध ठेवणारया शिक्षकांनाच यंदा शिक्षक पुरस्कार दिल्याची चर्चा कार्यक्रमानंतर नागरिकांमध्ये होती.

शिक्षणासारख्या पविञ क्षेञात पदाधिकारी व प्रशासन यांची मर्जी राखणारया शिक्षकानांच पुरस्कार मिळणार असेल तर प्रामाणिकपणे व चांगले शैक्षणिक कार्य करणारया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार कधी मिळणार हाही खरा प्रश्न आहे. या शिक्षकांना पुरस्काररूपाने चांगल्या कामाची पावती केव्हा मिळणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

दरम्यान, याबाबत तालुका गटशिक्षणाधिकारी संजय तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या


रांजणगाव एमआयडीसी कंपन्यांत स्थानिकांना रोजगारापासून डावलले जात आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही