फासेपारधी संघटना अधिकारासाठी तहसिलदारांच्या दारात

मांडवगण फराटा, ता. 18 ऑगस्ट 2014 (संपत कारकूड)- आठरापखड जातीमधील एक जात म्हणजे पारधी समाज. आजही विविध विकास योजनांपासून हा समाज वंचित राहिला आहे. शासनाने तयार केलेल्या विविध विकास आराखडयाप्रमाणे आत्तापर्यंत कोणतीही योजना राबविण्याचे काम जिल्हाधिकाऱयाचा आदेश असतानाही तहसिलदारांकडून कृती झाली नसल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदु फासेपारधी महिला संघटनेने सोमवारी (ता. 11) थेट तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मोर्चाचे आयोजक हिरालाल भोसले; संस्थापक अध्यक्ष- अखिल महाराष्ट्र हिंदु फासेपारधी संघटना, औंदुबर फटाले; अध्यक्ष- शिरूर तालुका जागृती मंच, अर्चना भोसले; महिला संघटक, सुरेखा भोसले; महिला अध्यक्ष फासेपारधी संघटना शिरूर, अजित पवार यांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सौ. गितांजली गरुड यांना दिले.

आपल्या पहिल्याच मोर्चामध्ये सामील झालेल्या पारधी समाजातील अनेक स्त्रीयांनी मोर्चा आणि आंदोलन म्हणजे काय असते? याचा अनुभव घेतला. आपल्या हक्कासाठी जागृत झालेल्या पारधी समाजाने आपल्या थेट व्यथा तहसिदारांसमोर मांडल्या. प्रमुख मागण्यांमध्ये अन्नसुरक्षेचा लाभ सर्वांना द्या, पिवळे रेशनकार्ड द्या, आमच्या मुलांना शिक्षणाचा लाभ द्या, सरकारी रुग्णालयात गेल्यास उपचार देण्यास टाळाटाळ केली जाते, शासकीय घरकुल योजनेअंतर्गत मिळालेली परंतु हल्ली दुसऱयांनी बळकविलेली घरे पुन्हा त्या लाभार्थीला देण्याबाबतची मागणी, आम्हाला जगण्यासाठी व आधारासाठी महसूलकडील सरकारी पड गायरान जमिनी कसण्यासाठी द्या, अशा एकूण 13 मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा पाठपुरावा करुन मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे, असे कार्यकर्तांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या