'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार!

शिरूर, ता. 11 ऑक्टोबर 2015- शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध प्रकारच्या घडामोडी घडत असतात. परंतु, सर्वच बातम्या जागेअभावी अथवा प्रसारमाध्यमांपर्यंत माहिती जात नसल्याने समोर येत नाहीत. परंतु, www.shirurtaluka.comने व्यासपिठ उपलब्ध करून दिले आहे.

शिरूर तालुक्यातील विविध गावांच्या बातम्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत नसल्याने अनेकजण आमच्याकडे प्रतिक्रियांद्वारे विचारणा करत आहेत. परंतु, तालुक्यात प्रत्येक गावामध्ये बातमीदार ठेवणे शक्य नाही. यामुळे प्रत्येक गावाची बातमी आमच्यापर्यंत पोचत नाही. पण, सोशल नेटवर्किंगमुळे हे आता शक्य होणार आहे.

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍप व फेसबुकद्वारे अनेकजण आपापल्या भागातील छायाचित्रे अथवा माहिती अपलोड करत असतात. परंतु, ही माहिती सर्वांपुढे येण्यासाठी आपापल्या भागातील योग्य माहिती आमच्याकडे पाठविल्यास ती www.shirurtaluka.com द्वारे प्रसिद्ध केली जाईल. यासाठी तुम्हीच बना संकेतस्थळाचे बातमीदार. आपल्या नावासह मराठीमध्ये टाइप केलेली बातमी, छायाचित्रे व व्हिडिओ संकेतस्थळ व फेसबुकवर प्रसिद्ध केली जातील. शिवाय, तुमच्या गावामध्ये होणार असलेल्या कार्यक्रमाची माहिती पाठविल्यास 'आज शिरूर तालुक्यात....' या पानामध्ये ठेवली जाईल.

माहिती पाठविताना सविस्तर असावी, कोणाची बदनामी करणारी अथवा द्वेषातून पाठविलेली नसावी. आमच्याकडे आलेली 'योग्य' माहिती प्रसिद्ध केली जाईल. परंतु, त्याचे अधिकार संकेतस्थळाकडे असतील. तर मग आजच बना संकेतस्थळाचे बातमीदार. बातमी पाठविताना shirurtaluka@gmail.com वर पाठवावी.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या