करडे दरोड्याचा तपास महिन्यानंतरही नाहीच!

करडे, ता. ७ जानेवारी २०१६ (तेजस फडके / सतीश केदारी)- येथील दरोड्याच्या  घटनेला एक महिना उलटून गेला तरी अद्यापही तपास न लागल्याने पीडित बांदल कुटुंबीय आजही दहशतीच्या सावटाखाली जगत असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

४ डिसेंबर रोजी मध्यरात्री करडेलगत  दावल-मलिक रस्ता परिसरात मच्छिंद्र रामभाऊ बांदल यांच्या घरावर पाच ते सहा दरोडेखोरांनी हल्ला चढविला. या वेळी हल्लेखोरांनी बांदल कुटुंबीयांना 'घरात काही असेल ते काढून द्या' अशी दमदाटी करीत लाकडी दांडके, कोयता, सुरे अशा घातक शस्त्रांनी बांदल कुटुंबीयांवर हल्ला चढविला होता.

या हल्ल्यात कुटुंबप्रमुख मच्छिंद्र रामभाऊ बांदल (वय ४६) यांच्या डोक्याला कोयत्याचे घाव बसल्याने त्यांचा मुलगा नारायण मच्छिंद्र बांदल (वय २२) यांच्या छातीलगत सुर्‍याचा वार झाल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नी शारदा मच्छिंद्र बांदल या किरकोळ जखमी झाल्या होत्या.

या गंभीर मारहाणीनंतर दरोडेखोरांनी बांदल यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने मिळून किमान १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मच्छिंद्र बांदल यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले असता दि. १२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना विचारले असता, अामचा तपास सुरु असुन अामची पाच पथके तपास करत अाहे. लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध लावला जाइल असे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या