संभाजीमहाराजांचा ३३५ वा राज्याभिषेक उत्साहात साजरा

वढू बु., ता. १८ जानेवारी २०१६ : श्री छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे जय शिवराय संघटना, छावा ग्रुप, वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या विद्यमाने छत्रपती संभाजीमहाराजांचा ३३५ वा राज्याभिषेक सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

संभाजीराजांच्या ३३५व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथे संभाजीराजांच्या मूर्तीला अभिषेक करून मिरवणूक काढून पालखी नगर रस्त्याने वढू बुद्रुक येथे आणण्यात आली. त्यानंतर वढू येथे समाधिपूजन, तसेच राज्याभिषेक सोहळाही पार पडला.

या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या  सुमनताई ढेरंगे (हिरकणी पुरस्कार), कुस्तीपटू पै. गणेश काशीद (क्रीडा), उल्हास शेवाळे (सामाजिक सेवा), अमोल थोरात (कला पुरस्कार), दशरथ यादव (साहित्यरत्न), हभप.गोरक्षनाथ पोटे (वारकरी), श्रीकांत डांगे (शिवशंभू सेवा),राहुल शिवले (निसर्गप्रेमी), हभप.धोंडीराज महाराज शिंदे (कीर्तन), जालिंदर आरगडे पाटील (युवा) आदींना सन्मानित करण्यात आले.

या वेळी शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन  केले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या