पुण्यात शुक्रवारी भव्य युवक मेळाव्याचे आयोजन

कोंढापुरी, ता. ३ फेब्रुवारी २०१६ (तेजस फडके)- पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. ५ ) दुपारी ३ वाजता कॉंग्रेस भवन पुणे येथे भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते किशोर गायकवाड  यांनी दिली.

या विषयी नुकतीच महत्वपूर्ण बैठक पुणे जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या अध्यक्षतेख़ाली पार पडली. या बैठकीस खेड-आळंदी युवक कांग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, शिरुर-हवेली युवक कांग्रेसचे अध्यक्ष विजेंद्र गद्रे, हडपसर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित घुले, जुन्नर शहराध्यक्ष रिजवान पटेल, जिल्हा सरचिटणीस देवेंद्र धर्मावत, हडपसर विधानसभेचे सरचिटणीस बापु बोराटे, खेड आळंदीचे पदाधिकारी अमोल दौंडकर तसेच जिल्हा युवक कांग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते

या मेळाव्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्रामदादा थोपटे, युवानेते संजय जगताप, महाराष्ट्र राज्य प्रभारी हिंमत सिंग व ऋत्वीक जोशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, राज्य सरचिटणीस सचिन सातपूते, चिंतामणी सोडकर व जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी आदी उपस्थितांना मार्गदर्शन करणार अाहे.

जिल्ह्यातून सुमारे पाच ते सहा हजार युवकांना या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आणण्य़ाचे नियोजन केल्याचेही किशोर गायकवाड यांनी  सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या