कवठे येमाईत सेवानिवृत्त प्राचार्यांकडून शाळेला मदत!

कवठे यमाई, ता. 6 फेब्रुवारी 2016 (सुभाष शेटे)- रयत शिक्षण संस्थेच्या आपल्या मूळ गावातील शिक्षण घेतलेल्या येथील न्यू इंग्लिश स्कूल शाखेचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले शाळेचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, सेवानिवृत्त प्राचार्य किसनराव रत्नपारखी यांनी या शाखेस 10 सायकल स्टॅंड, 6 कॉम्प्युटर टेबल, 2 आधुनिक प्रोजेक्‍टर दिले आहेत.

मांजरी बुद्रूक, हडपसर (पुणे) परिसरात रयत शिक्षण संस्थेत अध्यापना बरोबरच शालेय व्यवस्थापनाचे उत्तम कार्य करीत रत्नपारखी सेवानिवृत्त झाले. त्याच परिसरातील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करत त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक व शैक्षणिक साहित्याच्या देणगीतून कवठे येमाई हायस्कूलला मागील महिन्यात 5 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. बुधवारी (ता.3) सुमारे 100 सायकलींसाठी 10 सायकल स्टॅंड, 6 कॉम्प्युटर टेबल, 2 आधुनिक प्रोजेक्‍टर दिले आहेत.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठणला 6 कॉम्प्युटर टेबल तर अण्णापुर विद्यालयास 3 कॉम्प्युटर टेबल काल भेट दिले आहेत. रत्नपारखी यांनी सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम इतरांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी व आदर्शवत असा आहे. भविष्यात ही गावच्या रयत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मांजरी बुद्रूक, हडपसर परिसरातील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले आहे. प्राचार्य अशोक बोरुडे, सरपंच, उपसरपंच, मिठुलाल बाफना यांनी किसनराव रत्नपारखी यांचे अभिनंदन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या