महामार्गावर मालासह वाहने लुटणारी टोळी गजाअाड

रांजणगाव गणपती ,ता.९ फेब्रुवारी २०१६(विशेष प्रतिनीधी) :पोलीस व अारटीओ असल्याची बतावणी करुन महामार्गावर  मालासह वाहने लुटणा-या टोळीला रांजणगाव एमअायडीसी  पोलीसांनी मोठ्या शिताफीने गजाअाड केली.तर पोलीस अधिक्षक जय जाधव यांनी तपास पथकाला १५०००रु.बक्षिस जाहिर केले अाहे.

याप्रकरणी पोलीसांनी टोळीचा म्होरक्या रफिक उर्फ समीर उमर जमादार उर्फ सय्यद (रा.विद्यानगर, अाकुर्डी), नितीन शांताराम देवकर (रा.रामनगर, दत्तनगर, चिंचवड), महोम्मद शब्बीर महोद्दीन मनियार (रा.मोशी), कैलास उखा काळी (रा.कसबा,पुणे), परमेश्वर व्यंकट चिंचोलकर (रा.निगडी,पुणे), सुनिल अंकुश देवकाते (रा.चिखली,पुणे), अन्वर शखिफ शेख (कसबा, पुणे) या अारोपींना अटक केली अाहे.

सविस्तर माहिती अशी की,गेल्या महिन्यात खंडाळे गावच्या हद्दीत एका ढाब्यासमोर लोखंडीबिम सह कंटेनर चोरी झाल्याची तक्रार रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.या गुन्हयाचा तपास करत असतानाच (ता.३१जानेवारी)रोजी पुन्हा अशाच प्रकारे मरकळ-अाळंदी हद्दीत अशाच प्रकारे  चोरीचा गुन्हा घडला होता.या गुन्ह्यात सदर अारोपी स्कॉर्पिओ गाडीचा वापर करुन महामार्गावर थांबलेली वाहने हेरुन मालासह लुटत होती.याप्रकरणात कुठलाच पुरावा सापडत नसल्याने पोलीसांच्या तपासात अडचणी येत होत्या. दरम्यान यादोन्ही गुन्हयाची चोरीची पद्धत एकच असल्याने या टोळीला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक जय जाधव यांनी बक्षिस जाहिर केले होते. हा तपास करण्यासाठी पोलीसनिरीक्षक अशोक इंदलकर यांनी एक पथक तयार करुन शोध सुरु केला.रांजणगाव पोलीसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.तसेच या अारोपींचा चाकण,कुदळवाडी परीसरात शोध घेत असताना अारोपींना पोलीसांचा सुगावा लागताच अारोपींनी स्कॉर्पीओ गाडी सह पळुन जाण्याचा प्रयत्न केला.यावेळेस पोलीसांनी पाठलाग करुन अारोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.
 
 या प्रकरणी अारोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन या टोळीचा म्होरक्या रफिक उर्फ समीर उमर जमादार उर्फ सय्यद (रा.विद्यानगर, अाकुर्डी) हा दिडवर्षांपासुन फरारी होता.तसेच या गुन्हयाचा धाडसाने तपास  करणा-या पोलीस पथकास पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक जय जाधव यांनी कौतुक करत १५,००० रुपयांचे बक्षिस जाहीर केले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या