शिरूर नगर परिषदेच्या समित्यांची निवड बिनविरोध

शिरूर, ता.१३ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी): येथील नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची नुकतीच  बिनविरोध  निवड करण्यात अाली अाहे.

प्रत्येक समितीसाठी एक याप्रमाणे अर्ज दाखल करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदासाठी प्रवीण दसगुडे यांनी, पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समितीच्या सभापतीपदासाठी जाकीरखान पठाण, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदासाठी रवींद्र ढोबळे, नियोजन विकास, गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती सभापतीसाठी प्रकाश धारिवाल तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीसाठी सुवर्णा लटांबळे, उपसभापतीपदासाठी संगीता शेजवळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यासाठी निवडणुकप्रक्रिया राबविण्यात अाली. सर्व समित्यांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत असलेले पोळ यांनी सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर केली.

नवीन निवड झालेल्या विविध समिती सभापती व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :
स्थायी समिती सभापती- मनीषा गावडे सदस्य : प्रकाश धारिवाल, प्रवीण दसगुडे, जाकीरखान पठाण, रवींद्र ढोबळे, सुवर्णा लटांबळे.
नियोजन विकास, गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती : सभापती : प्रकाश धारिवाल, सदस्य- विजय दुगड, संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, अशोक पवार
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती : प्रवीण दसगुडे, सदस्य : विजय दुगड, महेंद्र मल्लाव, सुनीता कालेवार, अलका सरोदे
पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती : सभापती : जाकीरखान पठाण, सदस्य- आबीद शेख, दादाभाऊ वाखारे, अलका सरोदे, उज्ज्वला बरमेचा
स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती : रवींद्र ढोबळे, सदस्य- संतोष भंडारी, सुनीता कालेवार, शैला साळवे, आबीद शेख.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या