शिरुर तालुक्यात शिक्षकाच्या अात्महत्येने चर्चांना उधान...

शिरूर, ता. २५ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी): येथील विद्याधाम प्रशालेचे शिक्षक विलास मेसु करंजुले यांनी केलेल्या अात्महत्येचे पडसाद शिरुर शहरासह तालुकाभर उमटत असून अनेक ठिकाणी चर्चांना उधान अाले अाहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, विलास मेसु करंजुले (वय ५२, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर, सध्या रा. शिरुर) हे सुमारे ३० वर्षांपासून येथील  विद्याधाम प्रशाला येथे नोकरीस होते. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विलास करंजुले यांनी रांजणगाव पाडळी येथील राहत्या घरी गळफास लावून अात्महत्या केली. या नंतर सुपा पोलिसांनी शवविच्छेदन करुन पार्थिव बुधवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर नातेवाइकांनी अाक्रमक होत पार्थिव घेण्यास नकार देत सुपा पोलिस स्टेशनला घेऊन अाले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भुमिका  घेतल्याचे समजते.  यानंतर या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

या अात्मह्त्येचे पडसाद शिरुर शहरसह तालुकाभर उमटत असून अात्मह्त्येविषयी अनेक कारणे असल्याची मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये चर्चा  अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या