कोंढापुरीत विचित्र अपघातात पिता-पुत्रासह चौघांचा मृत्यू

कोंढापुरी, ता. २९ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे) : येथील कवठीमळानजीक नगर-पुणे रस्त्यावर स्विप्ट कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार  धडक देऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रोलिला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  पिता-पुत्रासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला अाहे.

या झालेल्या अपघातात आनंद विठ्ठल जवादे (वय 28,रा.बी.202 कल्पतरू सोसायटी, बेलापूर, नवीमुंबई), ईश्वर लालबहादुर जस्वाल (वय 26 रा. वाशिगाव  नवी  मुबई), राजेंद्र भगवंत गायकवाड (वय ४७) व त्यांचा मुलगा अनिकेत राजेंद्र गायकवाड (वय 16, रा. कवठीमळा, कोंढापूरी) असे चारजण या अपघातात मरण पावले आहेत. रोहित धोपड (रा. नवी मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास झाला.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनारस येथून मित्राचे लग्न लावून नवी मुंबई येथील तिघेजण आपली स्विप्ट कार MH 46-AP -2953 हिने नगर रस्त्याने पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होते. कोंढापूरी  येथील श्री वीरसाहेब मंदिरा जवळ पुण्याकडे जाणारी हीरो होंडा स्प्लेँडर मोटर सायकल क्रमांक MH -12-K Z -1525 हिला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने व कार चालकचा गाडीवरील ताबा सुट्ल्याने कार रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या ट्रोलिला धडकली. यावेळी झालेल्या तिहेरी अपघातात मोटर सायकल वरील गायकवाड पिता पुत्र व स्विप्ट कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार मधील रोहित  गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात स्विप्ट कार व मोटर सायकल यांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

दरम्यान, गायकवाड मोटारसायकलवरून आपल्या मुलाला घेऊन शेतात चालले होते. अनिकेत हा कासारी येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात नववी इयत्तेत शिकत होता. सोमवारी त्याच्या शाळेला सुटी असल्याने वडिलांबरोबर शेतात चालला होता. अपघातात दोघांनाही जीव गमवावा लागला. मृत बापलेकावर कोंढापुरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या अपघाताची माहिती कळताच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या