शिंदोडीच्या शेतक-यांचे धरणे आंदोलन सुरु

शिंदोडी, ता.२ मार्च  २०१६ (तेजस फडके) : साईकृपा शुगर लिमिटेड युनिट २ (ता.श्रीगोंदा ) या कारखान्याने सन २०१४-१५ या गळीत हंगामाचे ऊसाचे पैसे अदा न केल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत  अाज (गुरुवारी) गावातील विठ्ठल मंदिरात धरणे आंदोलन सुरु केले आहे.

गावातील ग्रामस्थांनीही या आंदोलनाला पठिंबा दिला असुन ऊसाचे पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन चालुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी सन २०१४-१५ मध्ये श्रीगोंदा येथील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज हिरडगाव युनिट २ या साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता .एफ आर पी प्रमाणे १४ दिवसात शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही पैसे मिळाले नाहीत .त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणुन शेतकरी उपोषणाला बसले आहेत. शिंदोडी येथील २५ शेतकऱ्यांचे अंदाजे ५० लाख रुपये येणे बाकी असुन हे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना जमीन विकण्याशिवाय कोणताच पर्याय नाही .ऊसाचे पैसे वेळेत न आल्याने शेतकऱ्यांचे बँकाचे हप्ते थकल्यामुळे बँकानी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला .
त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ अाली अाहे.तसेच काही शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न पैसे न मिळाल्यामुळे पुढे ढकलावी लागली अाहेत.त्यामुळे आता पैसे न मिळाल्यास आमच्या पुढे आत्महत्ये शिवाय दुसरा कोणताच मार्ग नसल्याचे बाळासो धावडे व दत्तात्रय फडके यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांना पांठीबा देण्यासाठी शिंदोडीचे माजी सरपंच इंद्रभान ओव्हाळ, माजी पोलीस पाटील बबनराव खेडकर, संपत वाळुंज, योगेश ओव्हाळ, निलेश वाळूंज, बाळासो गायकवाड, संदिप फडके, संतोष टाकळकर, पांडुरंग फडके, राहुल ओव्हाळ यांच्यासह सर्व शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या