अाकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कुलचा अाज उद्घाटन सोहळा

शिरूर, ता.७ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथे बहुविकलांग व विशेष मुलांसाठी सुरु करण्यात अालेल्या अाकांक्षा एज्युकेशन स्कूल या संस्थेचा उद्घाटन सोहळा अाज (सोमवार) दुपारी संपन्न होणार आहे, अशी माहीती सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका राणी नितीन चोरे  यांनी दिली.

या संदर्भात अाकांक्षा सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका चोरे म्हणाल्या, 'या पुर्वी अापल्या परिसरातील विशेष अपंग, बहुविकलांग विद्यार्थ्यांना सोयी अभावी परगावी जावे लागत असे. या मध्ये विद्यार्थ्यांसह पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. हिच गरज ओळखून अापल्या शिरुर शहरातच सर्व सोयी-सुविधांनी परिपु्र्ण शाळा सुरु केली अाहे. या मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास त्याच बरोबर पालकांचे मनोधैर्य देखील वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे.'

 या संस्थेचा उद्घाटनसमारंभ अाज दुपारी ३ वाजता ओमरुद्र मार्केट, बालाजी एम्पायर समोर, पेट्रोलपंपाजवळ, रामलिंग रोड, शिरुर येथे होणार अाहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे अावाहन राणी चोरे व नितीन चोरे यांनी केले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या