विक्रिकर निरिक्षक पदी निवडीबद्दल वैभव चव्हाण यांचा सत्कार!

शिरसगाव काटा, ता. ८ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथील कठीण परिस्थितीला झूंज देत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत दैदिप्यमान यशमिळविणा-या वैभव चव्हाण यांचा नुकताच ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला.

येथील  वैभव विश्वनाथ चव्हाण यांची घरची परिस्थिती जेमतेम असताना कठीण परिस्थितीत असताना मोठं होण्याचे उराशी बाळगलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासुन शिक्षणाबरोबरच लोकसेवा अायोगाच्या परिक्षा देत होते. या वर्षी पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवित विक्रिकर निरिक्षक पदापर्यंत मजल मारली अाहे.

या संदर्भात वैभवशी संवाद साधला असता, गरिबीची जाण ठेवुन व निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यासाठी अभ्यास व वेळेचे नियोजन केले. या यशामोठे अाई-वडिलांची मोठी साथ असल्याचे त्यांनी सांगितले.

या सत्कारप्रसंगी शिरुर तालुका युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष विजेंद्र सुभाष गद्रे, सरपंच शिंदे, नरेंद्र माने अादी  उपस्थित होते.      
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या