रांजणगाव पोलीस संघाने क्रिकेट स्पर्धेत बाजी मारत पटकाविला चषक

रांजणगाव गणपती, ता.९ मार्च २०१६ (सतीश केदारी) :  येथे रांजणगाव इंडस्ट्रियल असोशिएशन ने भरविलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशन च्या संघाने बाजी मारत चषक पटकाविला अाहे.

रांजणगाव इंडस्ट्रियल असोशिएशन(रिया)यांच्यावतीने दरवर्षी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे अायोजन केले जाते.या वर्षी अायोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले होते.सुमारे १५ दिवसांपासुन सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकुन रांजणगाव पोलीस स्टेशन सह कंपन्याचे ४८ संघ सहभागी झाले होते.
रांजणगाव पोलीस स्टेशन संघाने चमकदार कामगिरि करत अंतिम सामन्यात धडक मारली.या
अंतिम सामन्यात पेप्सिको संघाला नमवत या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला अाहे.

विजेत्या संघास पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक जय जाधव यांच्या हस्ते प्रदाण करण्यात अाला.
यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,सुनिल क्षिरसागर,अजय भुजबळ,विनोद काळे,उद्धव भालेराव,व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या