शंकेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलची प्रचारात अाघडीशिरसगाव काटा, ता. १२ मार्च २०१६ : येथील विविध कार्यकारी सोसायटीचा निडणुक प्रचार अंतिम टप्प्यात अाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचारात शंकेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलने अाघाडी घेतल्याचे चित्र अाहे.

शंकेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलची धुरा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र माने, शिरुर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. विजेंद्र सुभाष गद्रे तसेच माणिक कदम, रामचंद्र केदारी, दत्तु काटे, विकास जगताप, सरपंच संजय शिंदे, एम. एस. कदम यांच्यासह माजी संचालक सुभाष गद्रे, सुभाषदादा फराटे अादी ज्येष्ठ मंडळी सांभाळत अाहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्रचार अंतिम टप्प्यात अाला आहे. "छत्री" या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या या परिवर्तन पॅनेलला मतदारांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत अाहेत.

या निवडणुकीसाठी सर्वसाधारण खातेदार कर्जदार यांमधुन नरेंद्र अण्णासो माने, पांडुरंग गणपत चव्हाण, सचिन दत्तात्रय जगताप, विनायक दगडू जगताप, अण्णासाहेब बबन कदम, स्वप्नील जनार्दन काटे, हनुमंत बाळासो माने, जाफर नबीबभाइ शेख तर अनुसुचित प्रवर्गात निखिल नारायण गायकवाड, महिला प्रतिनिधी मधुन संगिता दिलीप कदम, वच्छलाबाई सोमनाथ शिंदे  इतर मागास प्रवर्गातून दिगंबर तुकाराम लोणकर व भटक्या विमुक्त प्रवर्गातून जयशिंग शंकर  जाधव हे उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात अाहेत.

सध्या छत्री चा प्रचार जोरात सुरु असून उमेदवार वैयक्तिक गाठिभेठींवर भर देत अाहेत. एकंदरीत वातावरणाचा विचार करता शंकेश्वर परिवर्तन पॅनेल ने प्रचारात मोठी अाघाडी घेतल्याचे चित्र दिसत अाहे. उमेदवारांनी देखील  या पॅनेल ची चिन्ह असलेली "छत्री" मतदारांना अाकर्षित करत असून कडक उन्हाळ्यात देखील या निडणुकीत परिवर्तन घडवुन सर्व जनतेला  या माध्यमातून प्रेमाची गार सावली देणार असल्याचा  ठाम विश्वास सर्वच  उमेदवारांनी www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केला. या साठी रविवारी १३ मार्च  ला सकाळी ९ ते दुपारी ४  पर्यंत येथील जिलहा परिषद शाळेत मतदान होत आहे. मतदारांनी कोणत्याही अामिषाला बळी  पडू नये, असे अावाहन  करण्यात अाले अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या