संविदणेत बिबटयाची दहशत कायम; पिंजरा बसवला

कवठे यमाई, ता. 13 मार्च 2016  (सुभाष शेटे) : गावातील लंघे मळ्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याची जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्यांचे अनेकांना दर्शन  घडू झाल्याने लंघे मळ्यासह सविंदणे ग्रामस्थ बिबट्याच्या दहशती खाली व भयभीत असल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांनी शिरूर वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने दोन पिंजरे आणून लंघे मळ्यात लावले आहेत .

शिरूरच्या पश्चिम भागात उसाचे मोठे  क्षेत्र असल्याने भक्षाच्या शोधात बिबटे या परिसरात आले असावेत, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. दिवसा ढवळ्या २ बिबटे गावाच्या पूर्वेकडून गावच्या पश्चिमेस असणा-या लंघे मळ्याकडे जाताना पाहिले असल्याचे ज्ञानेश्वर मोटे यांनी सांगितले. लंघे मळ्यात शेतीला पाणी देत असलेले शेतकरी नितीन नरवडे, अरुण सुदाम नरवडे, युवराज कानिफनाथ भोर, गोरक्ष लंघे यांनी मोकळ्या असलेल्या शेतात बॅटरीच्या उजेडात बिबट्याला  स्पष्टपणे पाहिल्याने सर्वांची एकच धांदल उडाली. बिबट्या त्यांच्याच दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या ओढ्याच्या दिशेने पळून गेला. स्थानिक शेतक-यांच्या म्हणण्यानुसार, याच परिसरात बिबट्याची दोन पिल्ले व दोन मोठे बिबटे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वनपाल सपकाळ व व विभागाचे कर्मचारी यांनी तातडीने लंघे मळ्यात दोन पिंजरे लावले आहेत. रात्रीच्या वेळी पाणी भरताना अथवा इतरत्र फिरताना ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी असे  आवाहन सपकाळ यांनी केले आहे. बिबट्याचे गुरगुरणे अथवा बिबट्या दिसल्यास फटाके अथवा ताटल्या वाजाविल्यास बिबट्या दूर जात असल्याचे व रात्री शेतीची कामे करताना  शक्यतो समुहाने घराबाहेर पडत सतर्कता बाळगावी, असे अावाहन सपकाळ यांनी केले अाहे. 

बिबट्याच्या वावराने साविंदणे व लंघे मळ्यातील नागरिक मोठ्याच दहशतीखाली जरी असले तरी वन विभागाने बिबट्यांना पकडण्याकामी तातडीने दोन पिंजरे लावल्याने व वन विभागाचे कर्मचारी स्वतः जातीने लंघे मळ्यात हजर असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या