भिमा पाटस कारखान्याच्या मळीमुळे हजारो मासे मृत्युमुखी

सादलगाव, ता. १६ मार्च २०१६ (संपत कारकूड) : मांडवगण फराटा-सादलगाव दरम्यान कोल्हापूर बंधा-यातील अडविलेल्या पाण्यात भिमा सहकारी साखर कारखान्याने सोडलेल्या मळीमिश्रीत पाण्यामुळे पाण्याचे प्रदुषण होऊन लाखो मासे मृत्युमुखी पडले अाहेत.

प्रत्येक वर्षी बंधा-यातील पाणी अडविल्यानंतर कारखान्याकडून प्रत्येक गळीत हंगामातील केमिकलयुक्त पाणी थेट भिमा नदीत कानगावच्या (ता. दौंड) बाजूने एका नाल्याद्वारे नदीमध्ये सोडले जाते. हे पाणी प्रक्रिया करुनच नदीमध्ये सोडले पाहिजे. परंतु, सहकारी साखर कारखाना सर्व नियम धाब्यावर बसवून कोणतीही भिती न बाळगता पाणी  नदीमध्येच सोडत आहे.

नदीवर मासेमारी करणा-या मच्छिमा-यांकडून हे अर्धे मेलेले मासे मोठया प्रमाणावर पकडून शिरुर, दौंड, पुणे येथे विक्रीसाठी टेम्पोद्वारे विक्रीसाठी घेवून जात आहेत. हे मासे खाणे आरोग्यासही अत्यंत धोकादाय असल्याचा निर्वाळा येथील डाॅक्टरांनी दिला आहे. प्रदुषणांमुळे दरवर्षी हजारो मासे मरण्याचे प्रसंग घडत असतांनाही कारखाना मात्र यावर कोणताही इलाज करीत नाही.

या बंधा-यातील पाण्यामुळे परिसरातील शेती भविष्यात उद्वस्थ होण्याचा धोका निर्माण झाला असून, शेतकरी केव्हा जागा होणार? असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या