रांजणगाव एमआयडिसीत खंडणी गोळा करणारा अटकेत

रांजणगाव गणपती,ता . १८ मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे) : रांजणगाव औद्यौगिक वसाहती मधे माथाडीच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्या एकाला  पोलिसांनी अटक केली असून त्यांचे तीन  साथीदार फरार झाले आहे. रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
 
या प्रकरणी प्रकाश पोपट थोरात (वय 18 रा. हिंगनगाव ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव अाहे. त्याचे साथीदार लाला सिद्धू टूल (वय 30, रा. हिंगनगाव ता. हवेली), गुलाब भिसे, शहाजी कांबळे हे तिघे फरार झाले आहेत.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव औद्यौगिक वसाहतील एव्हरी डेव्हिशन इंडिया कंपनीत कच्चा माल घेऊन येणाऱ्या ट्रक वाल्यांकडून काही तरुण माथाडीच्या नावाखाली  जबरदस्तीने पैसे गोळा करीत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक अशोक इंदलकर यांना मिळाली होती. तत्काळ त्यांनी पोलिस कर्मचारी मिलिंद देवरे, प्रकाश माने, किशोर तेलंग हे एव्हरी डेव्हिशन इंडिया कंपनीकडे गेले असता तेथे पाच तरुण ट्रक चालकाकडे, "आम्ही माथाडि आहोत चारशे रुपयांची पावती फाडावी लागेल" असे सांगून जबरदस्तीने पैसे गोळा करीत होते. या वेळी  पोलिस आल्याचे पाहून ते पळून जाऊ लागले. त्यांचा पोलीसांच्या पथकाने पाठलाग केला. त्यातील एकाला पोलिसांनी पकडले तर इतर पळून जाण्यास यशस्वी झाले आहे. या चार ही जणांवर खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक इदलकर करीत आहे.

रांजणगाव औद्यौगिक वसाहतीत असणारे सर्वच माथाडीच्या नावाखाली खंडणी गोळा करीत असल्याचे चित्र आहे. परंतु, यांच्या प्रमुखांपर्यंत पोलिस जाणार का? केवळ छोटे मासे पकडून उपयोग नाही तर मोठे मासे पकडले जाणार का? गब्बर झालेले या माशांना अभय मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या