विठ्ठलवाडीत विद्यार्थ्यांनी केली प्रभाफेरीद्वारे जलजागृती

विठ्ठलवाडी ता. २१ मार्च २०१६ (प्रविणकुमार जगताप): येथील पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जलजागृती केली.

पांडुरंग विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या वतीने या सप्ताहाचे अायोजन करण्यात अाले होते. या वेळी  विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक विनायक दरंदळे, कलाशिक्षक पी. बी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घोषफलक व घोषणादेत गावातुन फेरी काढली. यावेळी किसन गवारे, अणिता  शिंदे, अार. एस. नजन यांनी पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच अलका राउत, दिलिप गवारे, ललिता गाडे, संगिता गवारे, विशाल कुंभार अादी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे व घोषफलकाचे संयोजन कलाशिक्षक पी. बी. जगताप यांनी  केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या