विठ्ठलवाडीत मजुराची झोपडी अागीत खाक

विठ्ठलवाडी, ता. २२ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : येथील  डॅमवस्तीवरील मजूर बाळू राम कांबळे यांची झोपडी जळून खाक झाल्याची घटना घडली अाहे. या अागीत सुमारे १ लाख ४0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी दुपारच्या दरम्यान  येथील  मजूर बाळू राम कांबळे यांच्या झोपडीने अचानक पेट घेतला. उन्हाची तिव्रता जास्त असल्याने अागीने मोठ्या प्रमाणावर रौद्ररुप धारण केले होते. हे कुटुंब दुपारच्या वेळी मजुरी करण्यासाठी दुसर्‍याच्या शेतावर गेले होते. कुटुंबात लहान मुलीसह एकूण सात जण राहत आहेत. गेल्या वर्षी रोहित या मुलाचा विवाह झाला होता. या झोपडीत संसारोपयोगी वस्तू क्षणार्धात जळून खाक झाल्याने कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले आहे. सुदैवाने झोपडीत कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. विठ्ठलवाडी येथील गावकामगार तलाठी एस. आर. सिरसट यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून, १ लाख ४0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या या कु्टुंबाचे राहते घर जळाल्याने व लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याने कांबळे कुटुंब हतबल झाले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या