पिके जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरु...

मांडवगण फराटा, ता.२३ मार्च २०१६ (प्रतिनीधी) : सध्या उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच वाढू लागल्या असून शेतीतील उभी पिके पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर जळू लागली आहेत. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून पिके जगविण्याची धडपड सुरु झाली अाहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील घोडनदीकाठावरील शेतक-यांना पाण्याअभावी दरवर्षी दुष्काळाच्या मोठ्याप्रमाणावर झळा सोसाव्या लागतात. परंतु तीच परिस्थिती उद्भवल्याने चालुवर्षी भिमानदीकाठच्या परिसरातील शेतक-यांना देखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अाहेत. भिमानदीच्या पात्रात शेतक-यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतुने शासनाने लाखो रुपये खर्चुन अनेक गावांच्या भिमानदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधले अाहेत. परंतु, या बंधा-यांची सद्यस्थिती पाहता, काही बंधारे पाण्याअभावी कोरठे ठणठणीत पडले अाहेत. काही बंधा-यांमध्ये जेमतेम पाणी साठा उपलब्ध अाहे.

चालू वर्षी भिमानदी पात्रातील काही बंधा-यांच्या पात्रांमध्ये  वाळू माफियांकडून होणा-या सततच्या वाळू उपश्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असल्याने या बंधा-यांच्या पात्रात पाणीसाठा किंचितही न झाल्याने त्याचा फटका शेतक-यांच्या माथी मोठ्या प्रमाणावर बसत आहे. शेतक-यांना  उभी पिके  डोळ्यांदेखत जळताना पहावी लागत अाहेत. शेतक-यांनी जर वेळीच  अाप-अापल्या  परिसरातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यांकडे लक्ष दिले असते तर अाजही उभी पिके जळून गेली नसती. परंतु , त्यावेळेस शेतक-यांनी पाण्याचे महत्व जाणुन घेतले नाही व तसेच वाळू माफियांच्या, प्रशासनाने व शेतक-यांनी देखील त्वरीत मुसक्या अावळल्या असत्या तर अाज शेतक-यांवर ही वेळ अालीच नसती.

ज्या गावांमधील बंधा-यांकडे शेतक-यांनी जातीने लक्ष दिले. पाणी गळती, वाळूउपसा यांकडे कटाक्षाने लक्ष दिले त्या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा अद्याप बंधा-यांमध्ये ब-यापैकी पाणी साठा शिल्लक असल्याने दुष्काळाच्या झळा फारशा जाणवत नाहीत. ज्या भागातील भिमानदीकाठावरील शेतक-यांनी  बंधा-यांतील पाण्याची ज्यावेळी उपलब्धता असताना देखील योग्य प्रकारे नियोजन केले नाही. व हळुहळु पाण्याचे दुर्भिक्ष जाणवु लागताच, ज्या बंधा-यात उपलब्ध पाणी अाहे तेथील पाणी खाली असणा-या बंधा-यांमध्ये पाणी सोडावे असा हट्ट काही शेतकरी करु लागले अाहेत.

हि मागणी दुष्काळात अाता कितपत योग्य अाहे? जर पाणी सोडले गेले तर केवळ पाण्याचा अपव्यय होउन "तुला ना मला- घाल कुत्र्याला" अशी अवस्था होईल. मध्यंतरी पाणी वाटपात निर्णय होऊन पिण्यासाठी म्हणून उजनी साठी पाणी सोडले होते. त्यावेळी बहुतांश बंधारे उन्हाळ्यात देखील पाण्याने तुडुंब भरलेले होते.

काही बंधा-यांमधील पाणी गळतीमुळे वाया गेले तर काही बंधा-यांना प्रशासनाने त्वरीत ढापे न बसविल्याने पाण्याची मोठ्याप्रमाणावर गळती होऊन अाज शेतक-यांना शेतीतील पिके वाचविण्यासाठी अाता मोठी धडपड करावी लागते अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या