ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने 'जोडे मारो' अांदोलन

शिरूर, ता. ३० मार्च २०१६ (मुकुंद ढोबळे): तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे  हिरडगाव (ता.श्रीगोंदा) येथील साईकृपा शुगर अॅड अलाईड इंड. लि. युनिट 2 या कारखान्याने सन २०१४-२०१५ या कालावधीतील ऊस गाळपाचे पैसे न दिल्याने शिवसेनेच्या वतीने शिरुर तहसिल कार्यालयासमोर माजी मंत्री भाजपा नेते बबनराव पाचपुते यांच्या पुतळ्यास जोड़े मारो आंदोलन करण्यात आले.

खासदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राम गावडे, शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे यांच्या नेतृत्वा खाली उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, महिला जिल्हा संघटक श्रध्दा कदम, अर्चना सांडभोर, ज्योती रजपूत, अमृत पठारे, अलका सोनवने, योगेश ओव्हाळ, संजय देशमुख, अनिल पवार, कैलास भोसले, मयूर थोरात, सुनिल जठार अादी प्रमुख पदाधिका-यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे जोड़ेमारो आंदोलन करण्यात आले.

वाजेवाडी, पिंपळसुटी, मुखई, जातेगाव बुद्रक परिसरातील ऊस गाळपाचे कारखान्याने पैसे न दिलेल्या शेतकरी, महिलांच्या उपस्थितीत हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांना या आंदोलकांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी की, 'माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर या कारखान्याला शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, धानोरे, आंबळे, वाजेवाडी, पिंपळसुटी, मुखई, जातेगाव बुद्रक व गावांतील शेतक-यांचे ऊस गाळपाचे  पैसे २० महिणे होऊनही कारखान्याने दिले नाही. वेळोवेळी कारणे सांगुन कारखाना प्रशासनाने शेतक-यांची फसवणुक केली असून आमचे कष्टाचे पैसे न मिळाल्यास बायका मुलांसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा ऊस उतपादक शेतकरी व शिवसेच्या वतीने देण्यात आला.' यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख राम गावडे म्हणाले, जो पर्यंत शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.

यावर तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार व पोलिस निरीक्षक शिरूर यांनी दिले आहे. जर योग्य तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात अाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या