...तर मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटणार नाही-कंद

निमोणे, ता. १ एप्रिल २०१६ (तेजस फडके): "जिल्हा परिषदेने स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 'कन्या लक्ष्मी ठेव योजना ' आणली आहे. या योजनेतंर्गत  प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांमध्ये जन्म झालेल्या मुलीला २००० रू. चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र लगेच देण्यात येते. या रकमेचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी होईल. त्यामुळे मुलींचा जन्म पालकांना नकोसा  वाटणार नाही", असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी व्यक्त केले.

निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांचे हस्ते या योजनेचे राष्ट्रीय बचत पत्रांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, 'कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या महीलांच्या हिमोग्लोबिन तपासनीचा कार्यक्रम संपुर्ण पुणे जिल्हयात लवकरच हाती घेण्यात येणार आहे. "स्त्रीयांचा सामाजिक दर्जा उंचविण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने 'कन्या लक्ष्मी योजना' सुरू केली असून भविष्यात स्त्री जन्माच्या स्वागतासाठी आणखी काही योजना सुरु करण्याचा मानस आहे.'

या वेळी कंद यांच्या हस्ते नवजात मुलींच्या पालकांना या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. येथे चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी तेथे माती मिश्रीत वाळू बांधकामाला वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी संबधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिका-यांची दुरध्वनी वरुन चांगलीच खराडपट्टी काढली. तातडीने चांगल्या प्रतिची वाळू आणा तो पर्यंत काम बंद ठेवा अशी सुचना त्यांनी दिली. ग्रामस्थांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि कामात जर काही चुका होत असतील तर तातडीने माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. दिनकर सरोदे, धनंजय काळे, प्रविण दोरगे, गणेश काळे उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या