हिमोग्लोबिन तपासणी उपक्रम तालुक्यात प्रथमच कुरुळीत !

कुरुळी, ता.७ एप्रिल २०१६ (सतीश केदारी) : जिल्हा परिषदेच्या अारोग्य विभागाच्या माध्यमातुन महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी उपक्रम राबविण्याचा मान तालुक्यातील कुरुळी गावाला मिळाला असुन नुकतीच येथील सर्व महिलांची या उपक्रमांतर्गत तपासणी करण्यात अाली.

या उपक्रमाची सुरुवात सरपंच रायबा बोरकर,उपसरपंच प्रतिभा बोरकर,वैद्यकिय अधिकारी डॉ.मंजुषा सातपुते, बी.अार. बोरकर, बी जि.प. सदस्य कोळपे यांच्या हस्ते करण्यात अाली. तसेच प्रारंभी स्त्री जन्माचे स्वागत हि करण्यात अाले.

या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. मंजुषा सातपुते यांनी सांगितले की, महिलांमध्ये व मुलींमध्ये हिमग्लोबिन ची कमतरता मोठ्या प्रमाणावर सध्या जाणवत असुन या मुळे अनेक महिलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत असतो. म्हणुन जिल्हा परिषदेच्या अारोग्य विभागामार्फत सर्व महिला, मुलींची (१८-४९ वयोगट) हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार अाहे. या उपक्रमाची सुरुवात म्हणुन कुरुळी येथे सरपंच रायबा बोरकर यांच्या सहकार्याने प्रथमत: करण्यात अाली. शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री. पी. बी. गुरव, अार. बी. भोसले, के. डी. तुमवाड, एच. अाय. तांबोळी अादींनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एम. शिंदे यांनी केले तर अाभार एस. एस. डोइफोडे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या