भांबर्डेत ऊस तोड मजुरांना कपडेवाटप

भांबर्डे,ता.७ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी) : अस्मिता या सामजिक संस्थेच्यावतीने उसतोड मजुरांना नुकतेच कपडे वाटप करण्यात अाले.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद,शेतकरी तालुका प्रमुख योगेश ओव्हाळ,विभाप्रमुख बापु माशळकर, मा. सरपंच सुनिल वीर,ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय ढमढेरे,बंडु रोडे,शहाजी मांढरे,यांच्याहस्ते कपडे वाटप करण्यात अाले.या प्रसंगी उसतोडमजुर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या वेळी शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी सांगितले कि,दुष्काळग्रस्त भागातुन उसतोडमजुर पोट भरण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणावर येत असतात.सामाजिक जाणिवेतुन या दुष्काळग्रस्तांना प्रत्येकाने थोडीजरी मदत दिली तरी यांचं जगणं सुसह्य होण्यास मदत होणार अाहे.

अस्मिता संस्थेचे शिवसेनेच्या व ग्रामस्थांच्यावतीने यावेळी अाभार  मानन्यात अाले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या