ध्यास घेतला अन संपुर्ण गांव केले प्रकाशमान !

सादलगाव, ता.८ एप्रिल २०१६ (  संपत कारकुड ) : गांवाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास घेतला अन् संपुर्ण गांवाला स्ट्रिट लाइट चे काम पुर्ण करत संपुर्ण गावचं प्रकाशमान करुन टाकलं अाहे येथील सुहास नामदेव दौंडकर यांनी! 

सादलगाव हे तसे दुर्गम असलेले गांव.परंतु येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेले व व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असलेले सुहास दौंडकर यांनी गांव बदलण्याचा ध्यास घेतला अाणि ग्रामपंचायत च्या सहकार्याने व स्वत:च्या विशेष प्रयत्नातुन संपुर्ण गाव प्रकाशमान केले अाहे. तसेच विजेची समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडुन नुकताच एक वाढीव ६३ के.व्ही.ए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर देखील बसविण्यात आलेला आहे.यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांकडुन विशेष कौतुक केले जात अाहे.

त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये सध्या विविध विकास कामांना चांगलीच गती आली असून सध्या गावामध्ये संपुर्ण स्ट्रिट लाईटचे काम  पुर्ण झाले अाहे.त्यामुळे ४० वर्षानंतर नागरिकांच्या मुलभूत विकास कामांना प्रथमच गती निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालटानंतर प्रथमच निवडुन आलेल्या होतकरु तरुणांनी गावामध्ये विविध विकास कामांना स्वतः वेळ देवून ती कामे पुर्ण करण्याचा सपाटा लावला अाहे.तसेच गावामध्ये अंतर्गत रस्त्यांवर ६० हजार रुपयांचा मुरुमही नुकताच भरण्यात आला आहे. तसेच विविध प्रभागांमध्ये गेली चाळीस वर्षांपासून रखडलेला विकास कामांचा मोठा अनुषेश भरुन काढण्यासाठी तरुणांनी सध्या कंबर खसली असून ८ लाख रुपयांची अतंर्गत गटारलाईनचे कामदेखील सुरु केले आहे. हे कामही यात्रेच्या अगोदर पुर्ण करण्याचा निश्चय येथील तरुण सदस्यांनी व्यक्त केला आहे.

गावामध्ये  जुने सर्व वाद सध्या बाजुला ठेवून गावचा फक्त विकास करावयाचा असे ध्येय उराशी बांधून गावातील या नवख्या सदस्यांचे सध्या गावभर कौतुक होत आहे. १४ व्या वेतनआयोगाचे गावच्या विकास कामांसाठी सव्वासहा लाख रुपये गावासाठी उपलब्ध झाले असून यामधुनही मोठी कामे गावामध्ये मार्गी लागणार आहेत.

महिला सरपंच सौ. निर्मलाताई मिठे, उपसरपंच अविनाश पवार, देवीदास होळकर, अशोक लवांडे,तंटामुक्तीचे अध्यक्ष सुहास  दौंडकर,दत्तात्रय केसवड,या तरुण सदस्यांनी गाव तालुक्यामध्ये एक आदर्श माॅडेल म्हणुन तयार करण्याच्या मनोदय व्यक्त केला आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या