यंदा चांगला पाऊस;पाडव्यानिमित्त पंचांग वाचन

रांजणगाव गणपती, ता.९ एप्रिल २०१६ (सतीश केदारी): येथील मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचन करून  यंदा पाऊस चांगला असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. चांगल्या पावसाचे भाकीत ऐकून ग्रामस्थ, भाविक व शेतकऱ्यांनी या वेळी समाधान व्यक्त केले.

या वेळी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाचुंदकर, उपाध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, सचिव ऍड. विजयराज दरेकर, खजिनदार शेखर देव, बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर, बबनराव कुटे, दत्तोबा लांडे, ऍड. मकरंद देव, शिवाजीराव शेळके, भीमाजीराव खेडकर, उपसरपंच नवनाथ लांडे, प्रकाश लांडे आदींसह ग्रामस्थ व श्री खंडोबा यात्रा समितीचे सदस्य उपस्थित होते.

येथील अष्टविनायक महागणपती मंदिरात प्रथेप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त पंचांगाचे दरवर्षी वाचन करण्यात येते. त्याचप्रमाणे येथील रामभाऊ गुरव यांनी गुरुवारी रात्री प्राथमिक तयारी केली होती. शुक्रवारी द्रोणातील पाण्याचे पूजन पोलिस पाटील रत्नाकर पाचुंदकर व मुख्य विश्वस्त राजेंद्र देव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यातील पाण्याची पातळी ग्रामस्थांसमोर पाहण्यात आली.यावेळी  श्रावण महिन्यातील द्रोणामध्ये पाणी कमी आढळले; तर इतर 11 द्रोणांमध्ये भरपूर पाणी आढळले.त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यानंतर धान्याचा प्रसाद उपस्थितांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी व भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या