मंगलदास बांदल यांनी डोक्यावरील हंडा उतरविलाचं!

निर्वी, ता. १२ एप्रिल  २०१६ (तेजस फडके / सतीश केदारी ) : दोन दिवसांपुर्वी येथील कार्यक्रमात "महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणारच" असे अाश्वासन दिलेल्या  जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी स्वत: भेट देऊन पाणीपुरवठ्याची पाहणी करुन तातडीने निधी उपलब्ध करुन देत पिव्हीसी पाईप, मोटार व केबल उपलब्ध करुन दिल्याने येथील महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटणार अाहे.

निर्वी येथे दोन दिवसांपुर्वी झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी,गावातील महिला अाजपर्यंत कधीही वेशी च्या बाहेर पडल्या नाही.परंतु अाज तशी वेळ अाली असल्याचे सांगून पाण्याची समस्या जि.प.अध्यक्ष प्रदिप कंद, बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या निदर्शनास अाणुन दिली होती. या वेळी बांदल व जि.प. अध्यक्ष कंद यांनी मंगळवार पर्यंत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द येथील ग्रामस्थांना दिला होता. त्याचवेळी याच कार्यक्रमात पाणीपुरवठ्याच्या व स्थानिक पदाधिका-यांना देखील त्यांनी तातडीने या संदर्भात सुचना केल्या होत्या.

त्याच अनुषंगाने मंगळवारी (ता.१२) रोजी सकाळी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी समक्ष पदाधिका-यांच्या समवेत शिंदोडी येथील जीवन प्राधिकरणच्या जॅकवेलला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने पीव्हीसी पाईप, केबल व मोटार उपलब्ध करुन देण्याच्या सुचना संबधित खात्याच्या अधिका-यांना दिल्या. त्यानंतर लगेचच सगळी प्रशासकिय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि संध्याकाळी पाईपलाईन जोडून पाणी जॅकवेल मध्ये टाकून टेस्टिंग देखील करण्यात आले.त्यामुळे आता न्हावरे गावाबरोबरच निर्वि ग्रामस्थांना देखील  पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार आहे. यावेळी शिरुर पंचायत समितीचे ग्रामीण पाणी पुरवठयाचे शाखा अभियंता मछिंद्र सरवदे, निर्विचे उपसरपंच प्रकाश पवार, आबासाहेब सोनवने, शामराव शेलार, दत्तात्रय पवार, कैलास कांबळे, योगेश सोनवणे, रसिक नहार, इंद्रभान ओव्हाळ व मयुर ओस्तवाल उपस्थित होते.

बांदल हे नेहमीच स्वत:च्या वेगळ्या शैलीने तालुकाभर प्रसिद्ध असतात. काही दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथील पाणीप्रश्न असाच बांदल यांनी तातडीने मार्गी लावला होता. निर्वी ग्रामस्थांना हंडा उतरविण्याचा दिलेला शब्द पाळत स्वत: सर्व यंत्रणा हलवत ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात तातडीने पाणी उपलब्ध करुन दिल्याने परिसरात बांदल व प्रदिप कंद यांच्या कामाचे कौतुक केले जात अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या