जलयुक्तशिवारसाठी लोक सहभाग महत्वाचा- सौरभ राव

मलठण , ता. १४ एप्रिल २०१६ (कवठे यमाई, प्रतिनीधी) :  तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणावर  करावयाची असल्याने  शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी ग्रामस्थांचा लोक सहभाग देखील खुप महत्वाचा  असल्याचे मत  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मलठण येथे व्यक्त केले.

मलठण येथे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग,सर्वांसाठी पाणी,टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९,या योजनांच्या व फियाट इंडिया अॅटोमोबाईल प्रा.लि. रांजणगाव कंपनीच्या सहकार्यातून  जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत मलठण येथील ९ कि. मि. लांबीच्या व  फियाट कंपनीच्या वतीने होत असलेल्या सुमारे ५५ -लाख रुपयांच्या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाच्या प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, प्रांताधिकारी सोनप्पा यमगर, तहसिलदार राजेंद्र पोळ, फियाट इंडिया याटोमोबाईल प्रा.लि. रांजणगावचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुरुप्रताप बोपाराय, जनरल मेनेजर प्रमोद डोंगरे, गट विकास अधिकारी संजय चिल्लाळ, तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट, राणी वाव्हळ, सखाराम मावळे आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

सौरभ राव पुढे म्हणाले, फियाट इंडिया कंपनीने  येथे जलयुक्त शिवार अभियान राबविण्या कामी दिलेल्या योगदानाचा उपक्रम निश्चितच स्तुत्य व कौतुकास्पद आहे. ग्रामस्थांनी एकत्रित विचाराने जलसंधारणाच्या कामी  कंपनीकडून मिळालेल्या योगदानाचा योग्य उपयोग करून परिसरातील ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याकामी सक्रिय सहभागी व्हावे. ही कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण व्हावीत या द्र्ष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत होणा-या जलसंधारणाच्या कामाची गती व गुणवत्ते साठी प्राधान्याने लक्ष देणार असून या कामी आणखी निधी लागला तरी शासनाच्या माध्यमातून तो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राव यांनी ग्रामस्थांना दिले.  
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या