सणसवाडीत उपसरपंचावर ठेक्याच्या वादातून जोरदार हल्ला

सणसवाडी, ता. १५ एप्रिल २०१६ (शेरखान शेख)  : येथील अौद्योगिक क्षेत्रामध्ये  नेहमीच कंपनीच्या कामाच्या व इतर ठेक्यावरून होणारे वाद सर्वपरिचित असून अनेकदा हे वाद विकोपाला गेले आहेत. नुकतीच कंपनीच्या ठेक्याच्या वादातून येथील उपसरपंच युवराज दरेकर यांच्यावर येथील काही युवकांनी जोरदार हल्ला करत गाडीची तोडफोड केली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील एका कंपनीतील ठेक्यावरून हल्ला करणारे युवक व उपसरपंच दरेकर यांचा वाद झाला होता. यातून गुरुवारी (ता. 14) सकाळी उपसरपंच दरेकर हे सकाळी अकराच्या सुमारास सणसवाडी येथील आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम उरकून त्यांच्या ऑडी क्रमांक (एम एच १२ जे क्यू ७७८८) या गाडीतून पुणे-नगर रोडवरील मुख्य चौकात येत होते. यावेळी वेगवेगळ्या मोटारसायकल वरून हातात हॉकी व दांडके घेऊन आलेल्या केतन रोहिदास हरगुडे व दिपक साहेबराव दरेकर (दोघेही रा.सणसवाडी)  यांनी दरेकर यांच्या गाडीला मोटारसायकल आडवी लावली. यावेळी दिपक दरेकर याने दगड घेऊन गाडीवर व काचेवर मारले तर केतन हरगुडे याने हातातील हॉकीने गाडीवर व उपसरपंच दरेकर यांना मारण्यास सुरवात केली.

दिपक दरेकर याने देखील युवराज दरेकर यांना स्वतःच्या हातातील बेसबॉलच्या दांडक्याने मारण्यास सुरवात केली. यावेळी यांसोबत असलेल्या तीन ते चार जणांनी उपसरपंच यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यावेळी शेजारीच असलेल्या अन्य ग्रामस्थांनी मध्यस्थीने भांडणे सोडवीत यातील केतन हरगुडे यास पकडून ठेवले. यामुळे उपसरपंच युवराज दरेकर हे थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत शिक्रापूर पोलिसांना  माहिती मिळताच पोलिसांनी सणसवाडी येथे धाव घेत केतन रोहिदास हरगुडे यास ताब्यात घेतले. याबाबत उपसरपंच युवराज सुदाम दरेकर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. सदर आरोपींविरुद्ध शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, केतन रोहिदास हरगुडे यास अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना अद्याप अटक करण्यात अालेली नाही.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे करीत आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या