रामजन्म सोहळा सर्वत्र उत्साहात संपन्न

शिरूर, ता.१५ एप्रिल २०१६ (विशेष प्रतिनीधी) : शिरुर शहरासह तालुक्यात आज रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

हिंदूंचे आराध्य दैवत असना-या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिन आज संपूर्ण देशात राम नवमी उत्सवाच्या रूपाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो.शिरसगाव काटा येथे महादेव व महालक्ष्मी मंदिरात श्रीराम भजनी मंडळ व नागनाथ भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला.यावेळी पाळणा हलवुन रामजन्माचे स्वागत करण्यात अाले.मलठन येथे श्री वीर हनुमान मंदिरात आज राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  आला असल्याचे गणेश जामदार यांनी सांगितले.कवठे येमाई येथील श्री विठ्ठल रुख्माई मंदिरात भजन किर्तन होवून दुपारी १२ वाजता श्री रामांचा जन्मसोहळा पार पडला.उपस्थित भाविकांना या वेळी  महाप्रसाद वाटप करण्यात आले.रामनगर (फ़ाकटे)येथे ही रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम करण्यात आले.तसेच फाकटे येथेही यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या सर्वत्रच दुष्काळी परस्थिती असल्याने यात्रा शांततेत पार पडत असल्याचे बारकू वाळूंज व मनीष बो-हाडे यांनी सांगितले. रामजन्माच्या निमित्ताने शिरूरच्या पश्चिम भागासह बेट भागात  विविध गावात आयोजित श्री राम नवमी सोहळ्याच्या  कार्यक्रमासाठी भाविकांनी श्री रामाच्या दर्शना साठी मोठी गर्दी केली होती.या वेळी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्याच्या पुर्व भागात ही रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात अाला. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या