मलठणच्या मंडल अधिकार्‍याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा

शिरूर, ता.१७ एप्रिल २०१६ (विशेष प्रतिनीधी) : जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिलेल्या शेतजमिनीतील रस्ता करून देण्यासाठी ५ हजारांची लाच मागणार्‍या मलठण च्या मंडल अधिकार्‍याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.शशिकांत तमन्ना सनदी (रा. शिरूर) असे मंडल अधिकार्‍याचे नाव आहे.  

या मंडल अधिकार्‍यावर यापूर्वीही लाच मागणीचा एक गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आलेली होती. या गुन्ह्यात त्याला निलंबित देखील करण्यात आलेले आहे.

याप्रकरणी एका शेतकर्‍याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या शेतजमिनीमधून जाणारा रस्ता करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिलेले होते.या आदेशाची पूर्तता करण्याची जबाबदारी मलठणचा मंडल अधिकारी सनदी याच्याकडे होती.

रस्त्याचे प्रत्यक्ष ठिकाण दाखवून देण्याचे काम करण्यासाठी सनदी याने ५ हजारांची लाच मागितली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या