वडनेर खुर्द ला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

वडनेर खु., ता.१८ एप्रिल २०१६ (सतीश केदारी) : येथे नुकताच सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाल्याची माहिती साईक्रांती प्रतिष्ठाणचे संस्थापक नवनाथ निचित यांनी दिली.

साईक्रांती प्रतिष्ठाण व वडनेर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे अायोजन केले जाते.त्याचनुसार याहिवर्षी या विवाह सोहळ्याचे अायोजन करण्यात अाले होते.या मध्ये एकुण पाच विवाह पार पडले.

या कार्यक्रमाचे संयोजन सरपंच रतनशेठ निचित,साईक्रांती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विक्रम निचित,मच्छिंद्र निचित यांनी केले.सामुदायिक विवाह सोहळा अायोजित करण्याचे हे विसावे वर्ष असल्याचे अध्यक्ष विक्रम निचित यांनी सांगितले.या वेळी उपस्थित वधु-वरांना प्रत्येकी एक अांब्याचे झाड देउन वृक्ष जतन करण्याचे अावाहण देखील  यावेळी करण्यात अाले.

सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता व लग्नसराई मध्ये होणारा वारेमाप खर्च पाहता साईक्रांती प्रतिष्ठाण  व ग्रामस्थांकडुन अायोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समाजासाठी निश्चितच अादर्शवत असुन सामुदायिक विवाह हि चळवळ होणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या