"साईकृपा" शेतक-यांचे ३० एप्रिलपर्यंत उसबिल अदा करणार !

शिरूर, ता.१९ एप्रिल २०१६ (सतीश केदारी ) :   गेल्या अनेक दिवसांपासुन हिरडगाव(ता.श्रीगोंदा) साखर कारखान्याने अखेर नमते घेत टप्प्याटप्प्याने ३० एप्रिलपर्यंत उसबिल अदा करणार असल्याचे काल सोमवार(ता.१८ रोजी) शेतकरी व प्रशासनाला सांगितले.दरम्यान शेतक-यांनी दिवसभर तहसिलच्या पाय-यांवर बसुन अांदोलन केले.

या संदर्भात शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी बोलताना सांगितले कि,शिरुर तालुक्यातील शेतक-यांचे थकित उसाचे बिल गेल्या अनेक दिवसांपासुन हिरडगाव साखर कारखान्याने रखडविले होते.त्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासुन विनंत्या,अांदोलने सुरु होती.शिंदोडी अांदोलनात स्थानिक शेतक-यांची रक्कम जमा करण्यात अाली होती.त्यानंतर शिरुर येथे झालेल्या अांदोलनावेळी कारखाना प्रशासनाने ११ एप्रिलपर्यंत रक्कम जमा करण्याचे लेखी अाश्वासन दिले होते.परंतु तारीख उलटुनहि रक्कम जमा न केल्याने शेतक-यांनी पुन्हा अांदोलनाचा इशारा दिला होता.

त्यानुसार काल(सोमवारी) मार्केटयार्ड पासुन  तहसिलदार कचेरी पर्यंत मोर्चा चे अायोजन करण्यात अाले होते.तर कारखाना प्रशासनावर गुन्हा दाखल करा अन्यथा अाम्हाला अटक करा अशी मागणी करत शेतक-यांनी तहसिलदार कचेरी च्या पाय-यांवर बसुन काल दिवसभर अांदोलन केले.

यावेळी शिवसेनेचे शेतकरी तालुका प्रमुख योगेश विठ्ठल ओव्हाळ यांच्यासह शेतकरी संघटनेचे बाळासो घाडगे,साइक्रांती प्रतिष्ठान,वडनेर चे नवनाथ निचित यांच्यासह खेड व शिरुर तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होत्या. या वेळी अनेकांनी अापल्या  भावना व रोष प्रकट करत दिवसभर तहसिल समोर ठि्य्या मांडला.

अखेर सायंकाळी उशीरा कारखाना प्रतिनीधींनी शिरुर चे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर,तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्यासह अांदोलकांची भेट घेत ता.२० एप्रिल पासुन ते ३० एप्रिलपर्यंत बिल अदा करणार असल्याचे लेखी निवेदन केले अाहे.तसेच ता. २० ते २२ एप्रिल या तीन दिवसांत तीन गावांचे बिल  कारखाना देइल त्याचबरोबर उर्वरित गावांचे बिल ३० एप्रिल च्या अात जमा करणार असल्याचे या वेळी उपस्थितांना सांगितले.

सायंकाळी उशिरा समाधान झाल्याने सर्वच शेतक-यांनी अापले अांदोलन मागे घेतले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या