महापुरुषांच्या संयुक्तिक जयंत्या साज-या व्हाव्यात

निमोणे, ता. २१ एप्रिल २०१६ (प्रा.बाळासो गायकवाड ) : प्रत्येक जाती-धर्म जरी वेगळा असला तरी महापुरुषांनी सर्वच समाजासाठी महान कार्य केले असल्याने महापुरुषांच्या जयंत्या ह्या एकत्रच साज-या व्हायला हव्या असे मत प्रा.गोरख वेताळ यांनी अायोजित व्याख्यानात बोलताना या वेळी  व्यक्त केले. 

निमोणे येथे भिम गर्जना तरुण मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात
अाले होते.

सकाळी ग्रामस्थांच्यावतीने प्रतिमापुजन व सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते शाहु,फुले डॉ.बाबासाहेब अांबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात अाला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात  अाले. 

यावेळी अामदार बाबुराव पाचर्णे, नामदेव घावटे,पं.स सभापती सिद्धार्थ कदम, सरपंच वर्षाराणी थोरात, राष्ट्रीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड,तालुकाध्यक्ष राजेंद्र गायकवाड,दिलिप हिंगे,श्रीधर जगताप,तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ.मारुती जगदाळे, सहकारी सोसायटीचे चेअरमन योगेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश काळे, धनंजय काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.           

याप्रसंगी  बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले कि," भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांना मतदाराचा अधिकार दिला आहे.त्यामुळेच निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधीला पाच वर्षांनतर का होईना पुन्हा या सर्वसामान्य मतदाराच्या दारात जावे लागते हे या अधिकाराचे सर्वांत मोठे यश आहे " तसेच पुढे बोलताना म्हणाले की, बाबासाहेबांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा मुलमंत्र दिला त्यामुळे आज सर्वसामान्य तळागाळातील मुले आय.ए.एस्., आय.पी.एस. सारख्या पदांवर काम करीत आहेत. भारतीय राज्यघटना बदलण्याच्या कुणी कितीही वल्गना केल्या तरी ती बदलणे शक्य नाही. कारण एवढी सक्षम राज्यघटना पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. या वेळी  राष्ट्रीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड,प्रा.डॉ. बाळासाहेब गायकवाड,गौतमराव दळवी, रविंद्र थोरात, जे.आर. काळे, शिवाजीराव वाळके इ. नी आपले मनोगत व्यक्त केले.
          
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष बबनराव सातपुते, उपाध्यक्ष भगवान लाड, सरदार जाधव, संजय दिवटे,सचिन लोखंडे, विशाल पाडळे,अनिल कांबळे, अमोल कांबळे, सागर गायकवाड, हनुमंत गायकवाड, सागर जाधव, दशरथ चव्हाण, प्रविण पोटे, निरंजन गायकवाड, रवि गायकवाड यांनी प्रयत्न केले.

या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत गौतमराव दळवी यांनी केले सुत्रसंचालन राहुल पवार तर आभार प्रा. बाळासो गायकवाड यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या