अजुनही जिवंत अाहे माणुसकी...

वडनेर खु.,  ता. २२ एप्रिल २०१६ (सतीश भाकरे) :येथे काहि दिवसांपुर्वी घराला अाग लागुन संसार उघड्यावर अालेल्या कुटुंबाला ग्रामस्थांनी व परिसरातील राजकिय पदाधिका-यांनी मदत देत माणुसकी अद्याप जिवंत असल्याचे दाखवुन दिले अाहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि,बाळु निचित यांच्या घराला दुपारच्या सुमारास अचानक अालेल्या वादळाने घरातील चुलीतील विस्तवाने पेट घेतल्याने घराला अाग लागुन संपुर्ण घर भस्मसात झाल्याने कुटुंब उघड्यावर अाले होते.यावेळी येथील साइक्रांती प्रतिष्ठाण ने मदतीचे अाव्हाण केले होते.

साईक्रांती प्रतिष्ठानच्या आव्हानास प्रतिसाद देत शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश(माउली) घोडे,दादाभाउ चौधरी,तसेच परिसरातील अनेक  ग्रामस्थ,साईक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य यांची  एकुन मिळुन 40000 रु.रक्कम जळीतग्रस्त कुटुंबियांना मदत म्हणुन नुकतीच देण्यात आली.    

यावेळी  डॉ सुभाष पोकळे,सरपंच रतनशेठ निचित,बाबाजी निचित,साईक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम निचित,नवनाथ निचित, अरुण निचित, संदीप निचित,डी एम निचित सर,बाबुराव निचित सर,बाळू निचित सर,मछिंद्र निचित,विनायक निचित,जालिंदर निचित,श्रीकांत निचित,दत्ता चौधरी,निवृत्ती निचित,व परिसरातील अनेक ग्रामस्थ  मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या