स्पर्धेत टिकण्यासाठी जिद्द अावश्यक-प्रा.मुल्ला

तळेगाव ढमढेरे, ता. २६ एप्रेिल २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी जिद्दीबरोबरच कठोर परिश्रमाची अावश्यकता अाहे असे प्रतिपादन प्रा.एन.बी.मुल्ला यांनी केले.

तळेगाव ढमढेरे येथे पुणे विद्यापीठ व साहेबराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अायोजित पदवीग्रहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश ढमढेरे हे होते.

पुढे बोलताना ते म्हनाले कि,विद्यापीठाने महाविद्यालयाकडे पदवीग्रहण समारंभ अायोजित करण्याची दिलेली परवानगी हि उच्च शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना असुन यामुळे समाजात उच्च शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचणार अाहे.अशा समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्यालय,शिक्षक व विद्यापीठाविषयी  अादराची भावना निर्माण होउन पाहण्याची दृष्टी बदलणार अाहे.पुणे विद्यापीठाचा हा उपक्रम कौतुकास्पद अाहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना महेश  ढमढेरे म्हणाले कि,पदवीग्रहण म्हणजे विद्यार्थी जीवनातील एक अत्युच्च क्षण असतो.

यावेळी प्रा.एन.बी.मु्ल्ला व ढमढेरे यांच्या हस्ते पदवीधर विद्यार्थ्यांना  विद्यापीठाची  पदवीप्रदान करण्यात अाली. यावेळी पदवीग्रहण करताना विद्यार्थ्यांच्या चेह-यावर अानंद मोठ्या प्रमाणावर ओसंडुन वाहत होता.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.प्रदिप पाटील,उपप्राचार्य पराग चौधरी,संदिप सांगळे,परिक्षा विभाग प्रमुख मनोहर जमदाडे,रविंद्र भगत,डॉ.दत्तात्रय वाबळे,वि.प्रतिनीधी तेजल देंडगे,तसेच पद्माकर गोरे,सोमनाथ पाटील ,अमेय काळे,प्रा.मिनाक्षी काळे,विवेक खाबडे,सुमेध गजबे,प्रा.विजय गायकवाड, नामदेव भोइटे,अादी विद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोहर जमदाडे यांनी तर दत्तात्रय वाबळे यांनी सुत्रसंचालन केले.अाभार पराग चौधरी यांनी मानले 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या