शिरूरला अाता तीन न्यायाधीश करणार न्यायदान

शिरूर, ता.२६ एप्रिल २०१६ (सतीश केदारी ) : दोन न्यायाधीश कार्यरत असलेल्या येथील न्यायालयात सोमवार (ता.२५) पासुन आणखी एका न्यायाधीशाची नियुक्ती केली. अाता या पुढे तीन न्यायाधीश न्यायदानाचे काम करणार अाहेत.

गेल्या अनेक दिवसांपासुन या न्यायालयात एस. डी. घनवट हे मुख्य न्यायाधीश म्हणून व श्रीमती एम. ए. आधुके या सहन्यायाधीश म्हणून काम पाहत अाहेत. सोमवारपासून येथे श्रीमती आर. एन. खान यांचीही सहन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. त्यांच्यासाठी न्यायालयात स्वतंत्र न्यायकक्ष स्थापन केला अाहे.एस.डी. घनवट यांनी या न्यायकक्षाचे उद्‌घाटन केल्यानंतर खान यांनी सहन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.या वेळी शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र शितोळे, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे विश्‍वस्त अॅड. सुभाष पवार, अॅड. वसंत उबाळे, अॅड.प्रदीप बारवकर, अॅड.किरण आंबेकर, अॅड. एल. डी. बढे, अॅड. सयाजी गायकवाड,आदी बार असोशिएशन चे पदाधिकारी व वकिल उपस्थित होते.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येथील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे. सध्या तालुक्‍यात शिरूरसह रांजणगाव एमआयडीसी व शिक्रापूर अशी तीन पोलिस ठाणी असून तेथे दाखल गुन्ह्यांचा व खटल्यांचा निपटाराही शिरूर न्यायालयामार्फतच केला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासुन एकाच न्यायाधीशामार्फत चालविले जाणारे शिरूर न्यायालयातील न्यायदानाचे काम वाढत्या ताणामुळे हे  दोन न्यायाधीशांमार्फत चालविले जात होते. परंतु,तरीही प्रलंबित खटल्यांमुळे न्याययंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर  ताण येऊ लागल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून या दोन न्यायाधीशांच्या जोडीला आणखी एका न्यायाधीशाची नियुक्ती केली अाहे.

या वेळी  वकिलांकडुन या निर्णयाचे स्वागत करण्यात अाले अाहे. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या